________________
३७४
३७३ पुणरुत्तं'
अर्धमागधी व्याकरण
केलेले पुन:करणे, वारंवार तेच करणे, या अर्थी :
एए भमंति जीवा पुणरुत्तं जम्मसायरे भमे । ( पउम ३.१२९) भयंकर अशा जन्मरुपी सागरांत हे जीव वारंवार श्रमण करतात. ३७४ बाढ
(१) पुष्कळ, फार, खूप :- (१) तेण भणियं बाढं जाणामि। (कथा पृ६७) त्याने म्हटले मला पुष्कळ माहीत आहे (२) पिउणा समं बाढं कलहिऊण । (महा पृ. १८५ ब) बापाबरोबर खूप कलह करुन.
(३) बाढमुव्विग्गो धणदेवो । (महा पृ. १५०अ ) धणदेव फार उद्विग्न झाला. (२) होय :- भणियं सूरिणा बाढं । (कथा पृ. १७७) सुरीने 'होय' म्हटले. ३७५ भो (भोः)
संबोधन :- भो दूय गच्छ । (नल पृ. ८) हे दूता, तू जा. (अ) भो भो : (१) भो भो विप्पा । ( पाकमा पृ.७२) अरे ब्राह्मणांनो
(२) भो भो भूयपिसाया (सुपास ४९२) अरे भूतपिशाचांनो. ३७६ मणे' (मण्णे')
विमर्श, संशयुक्त विचार दर्शविण्यास :- ( १ ) किं मण्णे कारणं होज्ज। (वसु पृ. २२१) काय कारण असावे ? (२) कत्थ मण्णे पिया गया होज्ज । (वसु पृ.२२४) प्रिया कोठे गेली असेल ? (३) सुमिणस्स' के मन्ने कल्लाणे फलवित्तिविसेसे भविस्सइ। (नायास, पृ.४) स्वप्नाचे कोणते कल्याणकारक विशेष फळ असेल बरे ?
३७७ मुहु (मुहुः)
:
वारंवार • मुहु मुहु मोहगुणे जयंतं। (उत्त ३.११) वारंवार मोहगुण (मोहाचे परिणाम) जिंकणाऱ्याला.
१ पुणरुत्तं कृतकरणे। हेम २ . १७१
२
४
मणे विमर्शे। (हेम २.२०७) ३ पा.स.म. ८३१
इह मन्ये वितर्कार्थः निपातः । अभयदेव, नाया पोथी पृ.१८ ब.