SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 374
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग ३७३ सुलभ नाही काय? ३७१ पाएण, पायं, पायसो (प्रायेण, प्रायः, प्रायश:) सामान्य विधान, नियम सांगताना, सामान्यतः, प्रायः, या अर्थी :(१) पाएण कुपुरिसाणं न सहावो अन्नहा होइ। (नल पृ.२३) प्राय: दुष्टांचा स्वभाव बदलत नाही (२) पायं रसा दित्तिकरा नराणं । (उत्त ३२.१०) प्राय: रस (चांगले अन्न ) माणसांना अधिक बलवान करतात. (३) न एस पायसो पडिनियत्तइ वाही। (कथा पृ.१४९) बहुधा हा व्याधी बरा होणार नाही. ३७२ पुणो, पुण, उण (पुनः) (१) आणखी,पुनः :- (१) न पुणो एवं काहामो । ( पाकमा . पृ२०) पुनः आम्ही असे करणार नाही. (२) साहुं पुणो पणमिऊणं । (पउम ३.४२) साधूला पुनः प्रणाम करुन. (२) परंतु, या उलट, या अर्थी विरोध दर्शविण्यास : : (१) तुह जोग्गा सा कन्ना न उण अन्नस्स । ( सुर १२.८१ ) ती कन्या तुला योग्य आहे, पण इतराला नाही. (२) जे सप्पुरिसा हवंति ते मरणवसणं बहुं मन्नंति न उण इहलोय परलोयविरुध्दं आयरंति । (चउ पृ. २७) जे सत्पुरुष आहेत ते मरणरुपी संकट मान्य करतील, पण इहपरलोक विरुध्द आचरण करणार नाहीत. (३) एकाद्याच्या दृष्टीने ( ) या अर्थे : : (१) अहं पुण अन्नत्थ वच्चिस्सं । ( नल पृ. १३) मी मात्र दुसरीकडे जाईन. (२) अहं रक्खसो। को पुण तुमं । ( नल पृ५०) मी राक्षस आहे, पण तू कोण आहेस ? (अ) पुणो पुणो :- वरचेवर, पुनःपुन : (१) पुणो पुणो वंदई सक्को । ( उत्त ९.५९) इंद्राने पुन:पुन वंदन केले. (२) नाणा विहाइ दुक्खाइ अणुहोंति पुणो पुणो । (सूय १.१.१.२६) पुनःपुनः नानाविध दुःखे अनुभवतात.
SR No.007784
Book TitleArdhamagdhi Vyakaran
Original Sutra AuthorN/A
AuthorK V Apte
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages513
LanguageMarathi
ClassificationBook_Devnagari
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy