________________
३७२
अर्धमागधी व्याकरण
होईल, शक्य आहे, असा अर्थ होतो.
जइ एसा परपुरिसेण सह वच्चह वच्चउ णाम । (धर्मो पृ.६१) जर ही परपुरुषाबरोबर जात असेल तर खुशाल जाऊ दे तिला.
(आ) किं, कहं बरोबर 'नाम' चा उपयोग असता, शक्यता आहे, मला जाणून घ्यायचे आहे, असा अर्थ होतो.
(१) किं णाम कण्णाविउ बाणणाहं मण्णेसि गिण्णाह मिमं पएसं । ( उसा. १.६५) अरे कन्येच्या प्रियकरा, बाप ज्याचा स्वामी आहे अशा या प्रदेशाला तूं स्वामिदहिन समजतोस काय, ते तरी मला कळू दे. (२) किं णाम सोक्खं तुमए विणा मे। (उसा १.७५) तुझ्या विना माझे कसले सुख बरे ।
३७० नु (णु) (नु)
(१) शंका अनिश्चितता -युक्त प्रश्न :- (१) विसेसे किं नु कारणं । (उत्त. २३.१३) फरकाचे काय कारण बरे ? (२) जीवंतयस्स फणिणो को णु मणिं मुट्ठिणा हणइ । (जिन पृ. २७) जिवंत सापाच्या मण्याला कोण बरे मुठीने मारील ? (२) सौम्य निंदा :- कहं नु कुज्जा सामण्णं जो कामे न निवारए । (दस २.१) जो इच्छा दूर करीत नाही, तो श्रामण्य काम बरे करणार ?
(अ) किं, कहं बरोबर उपयोग असता, खरोखर, शक्य आहे, या अर्थी उपयोग होतो.
(१) कमल व्व किं नु एसा । ( अगड २०) लक्ष्मीप्रमाणे ही कोण बरे ? (२) पहवंति किं नु फणिणो गारुडसारं सरंताणं । ( जिन पृ. ३२)
गारुडसार स्मरणाऱ्यावर सर्पांचा प्रभाव पडणे शक्य आहे? (३) धम्मजुयाणं कह णु भयं होइ लोयाणं । ( नाण ३.१०६) धर्मातरत असणाऱ्यांना भय शकेल काय ?
नक्की असे आहे :
;
(आ) नणु ( ननु ) : असे नव्हे काय ? (१) सो नणु कल्ला मित्तो । (समरा पृ१५ ) तोच खात्रीने कल्याणकारक मित्र. (२) नणु सुलहमेत्थ निव्वेयकारणं । (समरा पृ. ३७) येथे वैराग्याचे कारण
१ अभ्यंकर, दस टीपा, पृ.६