________________
३७०
अर्धमागधी व्याकरण
सज्जन हे खरोखर स्वकार्यपराङमुख (पण) परकार्यरत असतात. ३६५ न
निषेध, नकार :- (१) कस्स विसमदसाविभाओ न होइ। (समरा पृ. १९८) कोणाला वाईट परिस्थिती येत नाही? (२) निव्वाणपत्तस्स य जीवस्स न जम्मो न जरा न मरणं। (समरा पृ.१७७) आणि निर्वाण प्राप्त झालेल्या जीवाला जन्म नाही, जरा नाही, मरण नाही.
(अ) न न : जोराचा होकार :
(१) न य न याणइ इमं पवंचं एसो। (समरा पृ. ७८८) हा हा प्रपंच जाणीन नाही, असे नाही (२) कालओ णं लोए न कयाइ न आसी न कयाइ न भवइ न कयाइ न भविस्सइ। (अंत ७८) कालठ्ठष्टीने हे जग कधी नव्हते असे नाही, कधी नाही असे नाही, कधी असणार नाही असे नाही. ३६६ नवरं (णवरं, णवर')
(१) फक्त, केवल :- (१) अम्हे नवरं तव विचित्तं केवलिपन्नत्तं धम्म परिकहेमो। (निरया. पृ५०) केवलींनी सांगितलेला विचित्र धर्म तेवढा आम्ही तुला सांगू. (२) बालत्तणओ केलिप्पिओ णवरं। (समरा पृ. ७) बालपणापासून त्याला केवळ खेळ आवडत.
(२) नंतर : दट्टण य तं दव्वं चिंता मंतिस्स नवरमुप्पन्ना। (समरा पृ. २२५) आणि ते द्रव्य पाहिल्यानंतर मंत्र्याच्या ठिकाणी चिंता उत्पन्न झाली. ३६७ नवरि (णवरि)
फक्त', केवल :- (१) वारिज्जइ नवरि पुन्नेहि। (सुर ८.२६)
फक्त पुण्याने वारिला जाईल. (२) लोगंमि नवरि दुल्लहो जणेण जिणदेसिओ धम्मो। (सुपास ५११) जगात जिनाने सांगितलेला धर्म तेवढा जनांना दुर्लभ आहे.
१ २ ३
णवरं तु केवले स्यात्। (मार्कं ८.११) णवर केवले। हेम. २.१८७ मार्कं ८१३; हेमचंद्राच्या मते 'नंतर' असाही अर्थ असतो.