________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३६९
(३) वाक्यालंकार, पादपूरण :- (१) बहु याणि उ वासाणि सामण्णमणुपालिया। (उत्त. १९.९५) पुष्कळ वर्षे श्रमणस्थिति आचखन. (२) पेच्छंति उ चित्तकूडं ते। (पउम ३३.४) त्यानी चित्रकूट (पर्वत) पाहिला.
(अ) किंतु१, परंतु :- विरोधदर्शक वाक्ये जोडण्यास२ ३६० दर३
थोडे :- (१) दरं जंपिउं। (समरा पृ१९९) थोडें बोलून (२) कयं दरहसियं। (कथा पृ. १२०) किंचित् हास्य केले. ३६१ दिट्ठिया (दिष्ट्या)
आनंद दर्शविण्यास :- (१) दिट्ठिआ दिट्ठासि जीवंती। (नल पृ. २४) तू जिवंत दिसलीस, ही आनंदाची गोष्ट आहे. (२) बहूणं दिवसाणं दिट्ठिया खेल्लणगं उवागयं। (महा पृ.१५३अ) पुष्कळ दिवसांनी खेळणे प्राप्त झाले, हे चांगले झाले. ३६२ दे
संमुखीकरण : (१) दे पिच्छामो ताव य तुह भगिणि। (सुर ९.१८९) चल, पाहूया तुझ्या बहिणीला (२) ता दे सामिणीए पणभिक्खं देह। (कथा पृ. ६७) तेव्हा स्वामिनीला प्राणभिक्षा द्या. ३६३ धिद्धी, धिरत्थु, धी, धी धी
धिक्कार असो :- (१) धिद्धी मं। (नल पृ.२४) माझा धिक्कार असो. (२) धिरत्थुदेव्वस्स। (समरा पृ.९३) दैवाचा धिक्कार असो. (३) धी मज्झ वरिवित्ती। (जिन पृ.२०) माझ्या वीरवृत्तीचा धिक्कार. (४) धी धी चंचलया जोव्वणस्स। (सुपास ५३१) यौवनाच्या चंचलतेचा धिक्कार. ३६४ धुवं (ध्रुवम्)
खरोखर, नक्की, खात्रीने :- (१) सो धुवं चोरो। (सुपास ५२५) तो नक्की चोर आहे. (२) हुंति परकज्जनिरया नियकज्जपरंमुहा धुवं सुयणा। (जिन पृ. १८)
१ २ ३ ४
किंतु, परंतु, हे वाक्यारंभी येऊ शकतात. वाक्ये जोडणे, परिच्छेद ४४० पहा. दरार्धाल्पे। हेम २.२१५ दे सम्मुखीकरणे च। हेम. २.१९६