________________
३६८
अर्धमागधी व्याकरण
वज्जि- स्समहं।। (सुपास. ५१०) पैसा जावो, बांधव दूर जावोत, लोकांकडून अपमान होतो, तरी मी जिनेद्राची पूजा टाळणार नाही.
(इ) तहा हि : उदाहरणार्थ :- तहा हि। केइ भणंति बंभो चेव देवाहिदेवो। (पाकमा. पृ.३७) उदाहरणार्थ काही म्हणाले ‘ब्रह्मदेव हाच देवाधिदेव आहे'. ३५८ ता, ताव (तावत्) |
(१) प्रथम, पहिल्यांदा :- (१) करेसु ताव भोयणं। (महा पृ.१७१अ) प्रथम भोजन कर. (२) ताव अहं एगागी रायाणं पेच्छामि। (कथा पृ. १२०) प्रथम मी एकटाच राजाची गाठ घेईन.
(२) तोवर, दरम्यान, तोपर्यंत :- (१) तए ताव इहेव चिट्ठियव्वं।
(समरा. पृ. ४२.५) तू तोवर येथेच रहावेस (२) ताव सहत च्चिय समायओ तं पएसं झउत्ति खेत्तपालो। (महा पृ. २७अ) दरम्यान अचानकपणे क्षेत्ररक्षक चट्दिशी त्या प्रदेशी आला.
(३) आत्ता :- बाले सि ताव तुम पुत्ता। (अंत १३१) मुला! तू आत्ता लहान आहेस.
(४) खरोखर, नक्की, या अर्थी जोर देण्यास :
(१) जयं पि भुंजेइ ताव रयणीए। (सुपास ४९६) जगसुद्धा रात्री जेवतेच (२) देवा चंदसूरतारयपमुहा ताव पच्चक्खदंसणेण नजंति। (महा पृ. २५५ ब) चंद्र, सूर्य, तारा इत्यादी देव तर प्रत्यक्ष दर्शनाने जाणले जातातच. ३५९ तु', उ (तु)
(१) पण, परंतु, तथापि, उलट :- (१) तुमं तु परत्थी परंमुहो। (नल पृ. ५०) पण तू परस्त्री-पराङमुख आहेस. (२) चइज्ज देहं न उ धम्मसासणं। (दस ११.१७) देहत्याग करीन, पण धर्माज्ञा सोडणार नाही.
(२) जोर देण्यास :- खाणी अणंत्थाण उ काम भोगा। (उत्त १४.१३) काम भोग म्हणजे अनर्थांची खाणच.
१
तहा य' याचा ही उपयोग ‘तहाहि' प्रमाणे होतो. तसेच, तहाय व तहाहि यांचा उपयोग अवतरणे उद्धृत करतानाही केला जातो. तु, उ हे वाक्यारंभी येत नाहीत.
२