________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
(नाया पृ. १२१) त्या भद्रेचे दोन पुत्र होते, ते असे जिणपालिय व जिणरक्खिय. ३५६ तओ, तत्तो, तो ( तत: )
(१) तेथून, त्या ठिकाणाहून च्युत झाले असता.
:
३६७
तत्तो चुया समाणा। (पउम २.८४) तेथून
(२) नंतर, त्यानंतर, मग :- (१) पढमं नाणं तओ दया । (दस ४.१०) प्रथम ज्ञान नंतर दया. (२) खणमेगं गयचेट्ठो ठिओ तओ जंपए एवं । (सुपास ४९४) एक क्षणभर निश्चेष्ट राहिला; मग असे म्हणाला. (३) म्हणून, परिणामत :- (१) कुमारमित्तं तमसि जओ तो हणेमि नो सहसा। (सुपास ५०८) तू राजपुत्राचा मित्र आहेस, म्हणून मी तुला एकदम मारीत नाही. (२) एयाइ कओ लहुओ हं तओ वेरिणी एसा । (सिरि १०८) हिने मला क्षुद्र केले, म्हणून ही वैरीण आहे. (३) छज्जीववहाओ कम्मबंधो। तत्तो संसारो । (कथा पृ. १३२) सहा प्रकारच्या जीववधाने कर्मबंध, त्यामुळे संसार. ३५७ तह, तहा (तथा)
(१) तसे, त्याप्रमाणे :- (१) मंतीहिं तहा विहियं । (सुपास ५१८) मंत्र्यांनी तसे केले (२) तहा करिस्सं । (सूय १.१४.९) तसे करीन.
(२) आणि, आणि सुद्धा तसेच :- (१) जीवाणं हिंसाए अलिएणं तह परस्स हरणेणं। (चउ पृ. २७) जीवांच्या हिंसेने, असल्याने तसेच परहरणाने ( २ ) तस्स भज्जा दुवे आसी रोहिणी देवई तहा । ( उत्त २२.२) रोहिणी व देवकी या त्याच्या दोन भार्या होत्या.
(३) होय, ठीक, बरे :- (१) राइणा 'तह' त्ति भणिए । (अरी पृ. ११) राजाने 'ठीक' असे म्हटले असता. (२) तह त्ति पडिवज्जिऊण सव्वमणुट्ठियं । (पाकमा पृ. ५८) ठीक असे म्हणून (श. - स्वीकारुन) सर्व केले. (अ) तहेव :- ' तसेच ' असा जोर देण्यास
-:
:
(१) मंतिणा तहेव कयं । (बंभ पृ. ५३) मंत्र्याने तसेच केले. (२) तेवि तहेव पुट्ठा। (कथा पृ. १३७) त्यांनाही तसेच विचारले.
(आ) तहवि, तहावि ( तथापि )
'तरी' या अर्थी विरोध दर्शविण्यास
:
जाउ सिरी विहडंतु बंधवा होउ लोय - अवमाणं । तह वि न जिणिंद - पूयं