________________
३६६
अर्धमागधी व्याकरण
(आ) जाव न - ताव :- नाही - तोच :
(१) जाव न कुणइ पणामं अवगूढो ताव सो रन्ना। (अगड ७२) (त्याने) प्रणाम केला नाही तोच राजाने त्याला आलिंगन दिले. (२) जाव य हत्थप्पमाणमेत्तं. तं न खणामि ताव समुट्ठिया महाभुयंगा। (महा पृ.२६ ब) हातभर तो (प्रदेश) मी खपला नाही तोच महाभुजंग (तेथून) बाहेर पडले. ३५१ जे
वाक्यालंकार, पादपूरण :
(१) तहा दुक्करं करेउं जे तारुण्णे समणत्तणं। (उत्त १९.३९) त्याप्रमाणे तारुण्यात दुष्कर श्रमणत्व करण्यास (२) नवरि सयं वरकरणं संपइ उचिंय न काउं जे। (सुर १.१२७) आता स्वयंवर करणे हे फक्त उचित नाही. ३५२ ठाणे (स्थाने)
बरोबर-योग्य आहे :- ठाणे उसा कामइ कामणिजं कामस्स पुत्तं। (उसा १.४०) कामाच्या कमनीय अशा पुत्राची उषा इच्छा करते, हे योग्यच आहे. ३५३ णवि' (नवि) ___वैपरीत्य :- अणुदियहं भुंजती नाणारुवाइं विसयसोक्खाई। न वि सा पावइ तित्ति।। (नाण १.४८) रोज नानाप्रकारची विषयसुखे ती भोगी; पण तिची तृप्ती झाली नाही. ३५३ णं
वाक्यालंकार :- तत्थ णं चंपाए नयरीए। (नायासं १) तेथे चंपा नगरीत. ३५५ तं (तद्)
म्हणून, परिणामत :- तं नत्थि णं मोग्गरपाणी जक्खे संनिहिए। (अंत, परि १०५, पृ.३३) म्हणून खरंच येथे जवळ मोग्गरपाणी यक्ष नाही. (अ) तं जहा (तद् यथा) : खालील प्रमाणे, पुढील प्रमाणे :तीसे णं भद्दाए अत्तया दुवे होत्था तं जहा-जिणपालिए य जिणरक्खिए य।
१ २ ३
हेम. २.२१७ णवि वैपरीत्ये। हेम. २.१७८ णं नन्वर्थे। आर्षे वाक्यालङ्कारेऽपि द्दश्यते। हेम ४.२८३