________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
जसजसा
तसतसा :
(१) जह जह जिणपूयणं तुमं कुणसि। तह तह दालिद्दतरू फलइ तुह गेहे।. (सुपास ५१०) जसजशी तू जिनाची पूजा करीत आहेस, तसतसा तुझ्या घरी दारिद्रयतरू फळत चालला आहे. (२) जह जह गुंजंति सावया विविहं । तह तह भएण हिययं कंपइ मह तत्थ रन्नंमि।। (सुर १०.२२८) जस जसा श्वापदांचा विविध आवाज होऊ लागला तसतसे तिथे अरण्यात माझे हृदय भयाने कापू लागले. ३४९ जा, जाव (यावत्)
(१) पर्यंत, तितका या अर्थी स्थल-काल' दर्शविण्यास :
(१) रज्जलाभं जाव मए वज्जिओ जुवइसंगो । ( नल पृ.४९) राज्यलाभ होईपर्यंत मी युवती संग टाकला आहे. (२) नमिराइणो सरीरे छम्मासे जाव दाहो जाओ। (चउ पृ. ३८) नमिराजाच्या शरीरात सहा महिन्यापर्यंत दाह झाला. (१) आता :- जाव तं तहेव जायं । (समरा पृ. ६२८) आता ते तसेच झाले,
(३) तेवढ्यात, दरम्यान :- (१) वच्छ वीसत्थो हवसु जाव ते जणयं पेच्छामि। (धर्मो पृ. ११९) बाळा, शांत हो, तेवढ्यात पहाट झाली. ३५० जा-ता, जाव-ताव ( यावत् - तावत्)
(१) जोपर्यंत - तोपर्यंत :
-
(१) नूणं जाव रिध्दी ताव चेव सोहा । (चउ पृ ४७) खरोखर जोपर्यंत रिध्दी आहे तो पर्यंत शोभा असते. (२) ता दुक्खं जाव संसारो। (कथा पृ. १६८) जो पर्यंत संसार आहे तोपर्यंत दुःख आहे. (२) जेव्हा-तेव्हा जाव (सा) न किंचि जंपइ ताव भणियं सहीए । (बंभ पृ.६१) जेव्हा (ती) काहीच बोलली नाही तेव्हा सखीने म्हटले.
:
१
३६५
ताव ताव :- जसजसा - तससा :
(अ) जाव जाव जाव जावं अभिक्कमेइ तावं तावं... महं ते उदए । (सूय २.१.२) जसजसा तो पुढे जाऊं लागला, तसतसे खोल पाणी (लागू लागले)
-
यावेळी द्वितीयेची अपेक्षा असते.