________________
३६४
अर्धमागधी व्याकरण
तेल.
(६) म्हणजे, ज्यामुळे, ज्यायोगे :- कुणह कंपि जहा सा जीवइ देवी सकुल ववत्था य निव्वह । ( महा ३.३८ ) काहीतरी करा की ज्यामुळे राणी जिवंत राहील आणि (त्याचवेळी) आपला कुल क्रमही टिकून राहील. ३४८ जह-तह, जहा - तहा ( यथा - तथा )
(१) जसे-तसे, ज्याप्रमाणे - त्याप्रमाणे : (अ) तुलना :- जह मुद्धमओ मायण्हियाए तिसिओ करेइ जलबुद्धिं । तह निव्विवेयपुरिसो कुणइ अधम्मे व धम्ममइं।। (सुपास ५००) ज्याप्रमाणे भोळे हरिण तहानेले असता मृगजलाच्या ठिकाणी पाणी मानते, त्याप्रमाणे अविवेकी पुरुष अधर्माच्या ठायी धर्म आहे, अशी बुद्धि धारण करतो. (आ) रीत (१) जहा लाहो तहा लोहो। (उत्त ८.१७) जसा लाभ तसा लोभ (२) जहा चंदो तहा सूरो वि आगओ । (निरया पृ. ३७) जसा चंद्र तसाच सूर्यही आला.
:
-
(२) असे - की : (१) अहं णं तहा जत्तिहामि जहा तव देहलस्स संपत्ती भविस्सइ। (निरया पृ. १०) मी असा प्रयत्न करीन की ज्यामुळे तुझा डोहाळा पुरा होईल. (२) तहा करिस्सं जहा तुह समीहियं संपज्जिस्सइ । (बंभ पृ. ६१ ) असे करीन की ज्यायोगे तुझी इच्छा पुरी होईल.
(३) कारण
म्हणून; ज्याअर्थी- त्याअर्थी :
(१) जह जंपइ अफुडत्थं तह हियए संठियं किं पि। (जिन पृ.८) ज्याअर्थी अस्फुटार्थी बोलत आहे त्याअर्थी हृदयात काहीतरी आहे. (२) जहा वामच्छिभुयाओ फुरंति जहा य जक्खदंसणाओ हरिसाइसओ जाओ तहा तक्केमि संपयं पिएण सह समागमं । (धर्मो पृ. ९३) ज्याअर्थी डावा डोळा व बाहु स्फुरत आहेत आणि ज्या अर्थी यक्षदर्शनाने हर्षातिशय झाला आहे, त्या अर्थी प्रियकराशी मीलन होणार, असे मला वाटते.
(४) जितका -तितका; इतका की - तितका :
व्रताची असमाप्ति मला जितका ताप देते
तह न तवइ मह वाही जह असमत्ती वयस्स एयस्स । ( नाण. ३.४७) या आहे तितका रोग सुध्दा देत नाही. जितका जितका तितका तितका,
(अ) जहा जहा - तहा तहा :