________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३६३
(नल पृ. २२) कदाचित् माझा पति भोजनासाठी येथे येईल. (२) जइ पुण कोइ कंपि उवायं कहेजा। (महा पृ. ३२० ब) कदाचित् कोणी काही उपाय सांगील. ३४६ जओ, जत्तो (यत:)
(१) जेथून, ज्या ठिकाणाहून :- जत्तो अहं समायाओ तत्तो किंचि नागयं। (कथा पृ. ७) जेथून मी आलो तेथून (माझ्याबरोबर) काही आले नाही.
(२) कारण : (१) नो सा चएज पुत्तं अवच्च नेहो जओ गरुओ। (महा पृ. १०० अ) ती पुत्राचा त्याग करणारा नाही, कारण अपत्य स्नेह हा दांडगा असतो. (२) एसा हि मज्झ धम्मायरिओ जओ एयाए संमत्तमूलं जिणधम्मं गाहिओ। (चउ प. ३४) हीच माझी धर्माचार्य, कारण हिनेच (माझ्याकडून) सम्यक्त्वमूल जिनधर्म घेवविला. ३४७ जह, जहा (यथा)
(१) जसे, ज्याप्रमाणे :- जहिच्छा तुम्हाणं। (बंभ पृ. ६५) जशी तुमची इच्छा .
(२) ज्याप्रमाणे (अ) तुलना :- तत्थ मंदा विसीयंति मच्छा अप्पोदए जहा। (सूय. १.३.१.५) थोड्या पाण्यात ज्याप्रमाणे मासे तद्वत् मंद प्राणी तेथे विषण्ण होतात.
(आ) रीति :- जहा सालिभद्देण दिन्नं दाणं तहा दायव्वं। (धर्मो पृ. १००) जसे शालिभद्राने दान दिले तसे द्यावे.
(३) पुढील प्रमाणे, खालील प्रमाणे :- (१) भणिओ सो जह एयं आसं वालेसु भो पहिय। (सुपास ५४६) त्याला असे म्हटले हे पाथिका, या घोड्याला वळव (२) न मुणह जहा दुब्बलस्स वि पंचाणणस्स सिगालसहस्सेहि वि न लंघिज्जइ परक्कमो। (महा पृ. ३९ब) तुम्हाला माहीत नाही की हजारो कोल्ह्यांना दुर्बळ सिंहाच्या सुद्धा पराक्रमावर मात करता येत नाही.
(४) अपरोक्ष विधानापूर्वी :- सो कुलवइणा भणिओ जहा-जहा सुहं चिट्ठह। (बंभ पृ.४७) कुलपतीने त्याला म्हटले 'सुखाने रहा'.
(५) उदाहरणार्थ (१) जहा आगासकुसुमं। (महा पृ. २५६ ब) जसे आकाशपुष्प (२) जहा वालुगाथाए तेल्लं। (समरा पृ१६७) जसे वालुकास्थानात