________________
३६२
अर्धमागधी व्याकरण
३४३ चेव, च्चिय', चिय
जोर देण्यास :- (१) जेहिं विरहो च्चिय न दिट्ठो। (वज्जा ६५) ज्यांनी विरहच पहिलेला नाही (२) अप्पहियपरहियाणं अप्पहियं चेव कायव्वं। (वज्जा ८३) आत्महित व परहित यातून आत्महितच करावे. (३) सव्वावत्थासुं पिय पभवइ कम्मं चिय जणस्स। (महा पृ. १९९ ब) सर्व अवस्थातही माणसावर कर्म हेच प्रभुत्व गाजवते. ३४४ जं (यद्)
(१) प्रत्यक्ष विधान देतांना 'की' या अर्थी :- (१) कहमिमं रायस्स कहिउं पारीयइ जं कुमारा सव्वे एक्कपए पेच्छंताणं चेव अम्ह दड्डा। (पाकमा पृ.२२) हे राजाला कसे सांगणे कश्य आहे की आमच्या देखत सर्व कुमार एकदम दग्ध झाले. (२) केण तुह निवेइय मेयं जं इह निवडणेणं पियसंपओगो वाहिविगमो पावनासो वा हवेज त्ति। (महा पृ. १६६ अ) तुला हे कोणी सांगितले की येथे (गंगेत) पडल्याने प्रियसंगोग व्याधिनाश वा पापनाश होईल? ___(२) ज्यामुळे, ज्याअर्थी कारण :- (१) जाया मे जीवियासा जं तुमं दिट्ठो सि। (बंभ पृ. ५१) तू दिसलाय या कारणाने मला (पुन:) जीविताशा आली. (२) दिट्ठासि जं जियंती तं सुकयं जग्गए अम्ह। (नल पृ. २६) ज्या अर्थी तूं (पुन:) जिवंत दिसलीस, त्या अर्थी आमचे सुकृत जागे आहे. ३४५ जइ (यदि) ___ (१) जर : जइ मे रोगावगमो भविस्सइ तओ सुंदरं चेव। (समरा पृ. २०४) जर माझा रोग दूर होईल, तर चांगलेच झाले. (२) कदाचित्, :- (१) जइ नवरं पाहुण साहू गओ होज्जा। (धर्मो पृ. ७७) कदाचित् पाहुणा आलेला साधु तेवढा गेला असेल. (२) नत्थि कोइ आयंको। परं जइ माणसिओ हवेजा। (कथा पृ. ९६) रोग कोणताही नाही; पण कदाचित् मानसिक (रोग) असेल.
(अ) जइ पुण : कदाचित् :- (१) जइ पुण मे भत्ता भोयणत्थं इत्थागच्छेज।
१
च्चेअ च्चिअ एवार्थे। मार्कं ८.१९