________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
(५) वाक्यालंकार', पादपूरण : (१) अप्पा हु खलु दु द्द मो। (उत्त १.१५) आत्मा हा खरे पहाता दमन करण्यास कठिण आहे (२) दो वि हु गच्छंति रायपासम्मि। (सुपास ५६०) दोघेही राजाजवळ गेले. (३) एवं खलु जंबू । (नायासं ३) जंबू, अशा प्रकारे.
३४२ च', य (च)
(१) आणि, व या अर्थी प्रत्येक शब्द वा विधान यासह अथवा शेवटचा शब्द वा विधान यानंतर एकदा :
(१) बहवे वेज्जा य वेज्जपुत्ता य। (विवाग पृ. ८) पुष्कळ वैद्य आणि वैद्यपुत्र (२) जम्मणं बालत्तणं कलाओ य । ( विवाग पृ. ६४) जन्म, बालपण आणि कला (३) वाणारसीए संखो नाम राया नमुई नामो य से मंती । (बंभ पृ. २७) वाराणसीत शंख नावाचा राजा आणि त्याचा नमुचि नावाचा मंत्री होतो.
३६१
(२) तथापि, तरी :- बालो च्चिय अवहिओ तुमं तइया, महिमंडले गविट्ठो ण य लद्धा तुज्झ वत्ता वि । (धर्मो पृ. ९१) तुला तेव्हा लहानपणीच पळविण्यात आले, पृथ्वीवर तुझा शोध केला, तथापि तुझी ( काहीच) वार्ता कळली नाही.
(३) वाक्यालंकार, पादपूरण : (१) न य भोयणं च रुच्चइ छट्ठावत्थाए कामिस्स। (अगड ४३) सहाव्या अवस्थेत कामी माणसाला भोजन रुचत नाही. (२) पत्तो य कामदेवो रायदुवारे य। (वसु पृ. २६९) कामदेव राजद्वारात पोचला. (अ) च च : समकालीन क्रिया दर्शविण्यास
:
(१) न य पुप्फं किलामेइ सो य पीणेइ अप्पयं । (दस १.२) तो फुलाला तर दुखवीत नाही, (पण ) त्याचवेळी स्वत: ( रस पिऊन) तृप्त होतो.
(२) वयं च वित्तिं लब्भामो न य कोइ उवहम्मई । (दस. १.४) आपल्याला तर उपजीविकेचे साधन मिळते. त्याचवेळी कोणालाही त्रास मात्र दिला जाता
नाही.
(आ) न य न य : हेही नाही - ते ही नाही :
१
२
—
न य हाणी न य वुड्ढी हो । ( पउम ३.४१ ) हानी ही होत नाही व वृध्दि ही होत नाही.
खलुर्वाक्यालंकारे। अभयदेव (नाया फेथी, पृ. १२ अ)
च, य हे वाक्यारंभी येत नाहीत.