________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
(अ) किमु :
( १ ) जास्त काय सांगावे ? :- देवीओ विन चित्तं हरति किमु अन्न नारीओ। (कथा पृ. १०८) देवा स्त्रियासुद्धा चित्त हरण करु शकत नाहीत, मग इतर स्त्रियांबद्दल काय सांगावे ?
(२) विमर्श : - किमु देवया माणुसी वा होज्ज त्ति । (वसु पृ. २३०) काय, देवता की मानवी स्त्री असेल ?
(आ) किमुय ( किमुत) :
जास्त काय सांगावे? :- पुरिसो वि अपहरंतो न खमोवहिउं किमुय अबला। (सुपास ५३८) अपहार करणारा पुरुष सुद्धा वध्य नाही. मग स्त्रीबद्दल काय सांगावे?
३५९
(उ) किं बहुणा :
जास्त काय सांगावे ? :
किं हु धम्मेणं लब्भइ हियइच्छियं सव्वं । (जिन पृ. ३७) जास्त काय सांगावे? धर्माने सर्व इच्छिते प्राप्त होतात.
(ऊ) किंवा :
विकल्प :किमेयं तीरं उयाहु दीवं किं वा को वि पव्वयवरो। (कथा पृ. १४५) हा किनारा आहे की द्वीप आहे किंवा कोणता तरी सुंदर पर्वत आहे ? ३३८ किणो', किह, कीस
का, कसे या अर्थी प्रश्न करण्यास :
(१) कीस तुब्भे पुव्वपुरिसज्जिएणं विहवेणं गव्वं उव्वहह । (समरा पृ. ४०९) वाडवडलांनी मिळविलेल्या धनाच्या जोरावर तुम्ही का गर्व वहाता ? (२) किणो हससि । ( का हसतोस ?) (३) किह तुम्ह वयणं पडिकूलेमि । (कथा पृ. ९८ ) तुमच्या बोलण्यास मी प्रतिकूल कसे बोलीन ? ( करीन)
३३९ किर, किल
(१) किर रावणस्स भाया महाबलो नाम
कुंभकण्णो त्ति। छम्मासं .... सेज्जासु निरंतरं सुयइ । । ( पउम २.१०८ ) असे
१
२
(१) असे सांगतात की
-:
किमु संभावनायां स्यात् विमर्शे चापि द्दश्यते।
किह कीस किणो प्रश्ने । मार्कं ८.१६