________________
३५८
अर्धमागधी व्याकरण
(अ) कह कह वि :- कसे तरी, मोठ्या कष्टाने :
(१) कह कह वि आगारसंवरं काऊण। (महा पृ. ४१ ब) कसे तरी इंगित (चेष्टा) लपवून. (२) कह कह वि पयत्तेणं विहिणा वि विणिम्मिया मन्ने। (सुपास ५९०) मला वाटते. ब्रह्मदेवाने सुद्धा प्रयत्नपूर्वक मोठ्या कष्टाने तिला निर्माण केले.
(आ) कह. पुण :- कसे बरे :- कहं पुण इमएि भावत्थो णायव्वो।
(धर्मो पृ. ४७) कसा बरे हिचा भावार्थ जाणावा? ३३६ कामं
हे कबूल, असे धरून, हे मान्य करुन :
कामं तु देवीहि विभूसियाहिं न चाइया खोभइउं तिगुत्ता। तहावि एगंतहियं ति नच्चा विवित्तवासो मुणिणं पसत्थो।। (उत्त ३२.१६) अलंकार धारण करणाऱ्या देवस्त्रिया सुद्धा त्रिगुप्ति पाळणाऱ्या मुनींना क्षुब्ध करण्यास समर्थ होत नाहीत हे मान्य तथापि (तोच) श्रेष्ठ हित असे जाणून मुनींच्या बाबतीत एकातवास हा प्रशस्त आहे. ३३७ किं
(१) का, काय, कशास या अर्थी प्रश्न करण्यास
(१) भो भो किं तुब्भेहिं कओ उवद्दवो नायलोयस्स। (पाकमा पृ. १९) अहो, तुम्ही नागलोकाला का उपद्रव दिलात? (२) किं तुज्झ केणावि खंडिया आणा। (सिरि ३४०) तुझी आज्ञा कुणी मोडली काय?
(२) काय उपयोग? - (ज्याचा उपयोग व्हायचा तो शब्द तृतीयेत; ज्याला उपयोग व्हायचा तो शब्द षष्ठीत) :- (१) मे किं रहेण। (नल पृ. ११) मला रथाचा काय उपयोग? (२) रज्जेण किमंधस्स। (संपइ १.५९) आंधळ्याला राज्याचा काय उपयोग?
(३) समासात पूर्वपदी 'किं' असता 'वाईट' असा अर्थ :- काउरिस.
१ २
इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे हा शब्दश : अर्थ जेव्हा किं अध्याहृत असते, तेव्हा उच्चारावरुन वाक्य प्रश्नार्थक ठरते : कुसलं मम बहिणीए। (नल पृ. २४) माझ्या बहिणीचे कुशल आहे ?