________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३५७
३३२ ओ?
(१) कोप :- ओ ण भवणं पुणो वच्चसि। (पुनः घरी जाणार नाहीस)
(२) सूचना :- (१) सढो सिओ। (कुमार ४.१३) शठ आहेस तू (२) ओ पेच्छ पेच्छ सुंदरि। (सुर २.९९) सुंदरी पहा पहा.
(३) वितर्क :- (१) कुमरा सामलगोरा ओ एए रामलक्खण व्व दीसंति।
सावळा आणि गोरा असे हे कुमार रामलक्ष्मणाप्रमाणे दिसत आहेत. (२) राआओ पुरिओ इमो। हा पुरुष राजा (असेल)२
(४) विस्मय :- ओ भग्गो हरचावो सिसुणा पुत्तेण दहरहस्स। दशरथाच्या लहान मुलाने शिवधनुष्य मोडले।
(५) अनुताप, पश्चात्ताप :- (१) ओ पत्थिया विलासा तव हेर्छ। (सुपास ५३१) तुझ्यासाठी विलास पाहिजे होते।
(६) पादपूरण :- सिरिगंधवाहणस्स ओ पासंमि गओ अहं तइया
(सुर ४.४६) तेव्हा मी सिरिगंधवाहणाच्या जवळ गेलो. ३३३ कत्थ-कत्थ (कुत्र-कुत्र)
दोन वस्तू वा व्यक्तिमधील मोठा फरक दर्शविण्यास :
(१) कत्थ नलो कत्थ खुजओ एसो। (नल पृ. ३०) कोठे नल आणि कोठे हा खुजा ! (२) कत्थ-महागंगा... कत्थ नगरनिद्धमणी। (धर्मो पृ. १९२) कोठे महानदी गंगा आणि कोठे गावातल्या सांडपाण्याचा प्रवाह। ३३४ कयं (कृतम्)
निषेध, निवारण, पुरे :- (१) कअं कअं तुज्झ विअत्थणेण। (उसा १.६८) तुझी प्रौढी नको. (२) उसेविसाएण कअं। उसा. १.७६) उषे, विषादपुरे ३३५ कह,कहं (कथम्) कसे :- (१) कह अप्पा रक्खिओ तुमए। (जिन पृ. २३) तू आपले रक्षण कसे केलेस? (२) कहं चरे कह चिढे कहं आसे कहं सए। (उत्त ४.७) कसे हिंडावे, कसे उभे रहावे, कसे बसावे, कसे झोपावे? (३) कहं परलोओ चेव नात्थि। (समरा पृ. १७६) परलोकच कसा नाही?
१
ओ सूचनापश्चात्तापे। हेम २.२०३; ओ सूचना वितर्क अनुताप प्रकोप विस्मये। मार्क ८.५ मार्कंडेय, ८.५
२