________________
३५६
अर्धमागधी व्याकरण
पृ.७६) तुम्ही शरीराची व्याधी दूर कराल की कर्मरूपी व्याधी?
(२) तुब्भे पउमनाभेणं सद्धिं जुज्झिहह उयाहु पिच्छिहह। (नाया पृ.१९२) तुम्ही पउमनाभाबरोबर युद्ध कराल की नुसते पहाल?
(३) ता किं जुज्झामो उयाहु सेवं करेमो। (कथा पृ.५३) तेव्हा युद्ध करूया की सेवा करूया? ३२९ उवरि, उवरिं (उपरि)
(१) वर :- (१) भगवओ उवरि भत्तिबहुमाणो। (समरा पृ.१८) भगवंतावर भक्ति व बहुमान. (२) किं तु तुमए नरिंदस्स उवरिं कोवो न कायव्वो। (समरा पृ.२९) परंतु तू राजावर रागावू नयेस.
(२) नंतर :- (१) पंचण्हं पुत्ताणं उवरिं धूया अहं जाया। (सुर ६.१०९) पाच पुत्रांनंतर मी कन्या (त्यांना) झाले. (२) ताण य चउण्ह पुत्ताणमुवरिं जाया दारिया। (कथा पृ. ९५) आणि त्यांना चार पुत्रानंतर कन्या झाला.
(३) आणखी, यावर, अधिक :- उवरिं किं भणामि। (कथा पृ. १४५) आणखी काय सांगू ३३० एव
जोर देण्यास :- (१) अहं तत्थेव चिट्ठामि। (समरा पृ. ३८) मी तेथेच राहिलो. (२) मम समक्खमेव पंचत्तमुवणीओ। (समरा पृ. ३८) माझ्या समक्षच
मेला.
३३१ एवं
(१) असे, अशा प्रकारे, अशात-हेने :- (१) चंदजसाए विवुत्तं – एवं होउ त्ति। (नल पृ.२६) चंदजसानेही म्हटले ‘असे होऊ दे' (२) पुव्वकयकम्मपरिणइवसेणं एवं परिकिलेसमइणो जीवा हवंति। (समरा पृ. १०) पूर्वी केलेल्या कर्मांच्या परिणामाने जीव अशाप्रकारे दुःखभागी होतात.
(२) होकार, होय :- कुमारो भणइ - एवं। (बंभ पृ.७३) कुमार म्हणाला ठीक आहे.
१
एवं प्रकारोपभयोरङ्गीकारेऽवधारणे।