________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३५५
(४) कारण, हेतु :- (१) गंगा वि जण्हुणा आणीय त्ति तेण जण्हवी जाया। (पाकमा पृ. २८) गंगा ही जण्हुने आणली या कारणाने ती जाह्नवी झाली. (२) एएण... परदव्वावहारो कओ त्ति वावाइज्जइ एसो। (समरा पृ. ४९१) याने परद्रव्यापहार केला या कारणाने याला ठार करण्यात येत आहे.
(५) उद्देश, प्रयोजन : (१) सरीरस्स विणासो न होजा इइ मए सरीरं आणीयं। (शरीराचा नाश होऊ नये या उद्देशाने मी शरीर आणले) (२) अहं पि सुणेमि त्ति अलीयपसुत्तं कयं। (चउ पृ. ४१) मी सुद्धा ऐकीन या उद्देशाने झोपेचे सोंग केले.
(६) कधी पादपूरण म्हणून :- तुट्टेणं नरवइणा दिन्ना कुमरस्स निययधूय त्ति। (अगड १५२) संतुष्ट झालेल्या राजाने आपली कन्या कुमाराला दिली. ३२७ इव', पिव, मिव, विव, विय, व, व्व (इव)
(१) उपमा, तुलना :- (१) मेरु व्व वाएण अकंपमाणो। (उत्त २१.१९)
वाऱ्याने कंप न पावणाऱ्या मेरुप्रमाणे (२) विप्फुरइ जस्स रविमंडलं व नाणं। (महा १.१) ज्याचें ज्ञान सूर्य मंडला प्रमाणे प्रकाशते (३) सागरो इव गंभीरा। (ओव पृ १९) सागराप्रमाणे गंभीर
(२) जणु काही, उत्प्रेक्षावाचक :- (१) जस्स करिनियरघंटारवेण फुट्टइ व बंभउं। (नल पृ. ४) ज्याच्या हत्ती समुदायावर असणाऱ्या घंटांच्या आवाजाने ब्रह्मांड जणु फुटते (२) रोवंति व दिसाओ। (धार्मो ४ पृ.) जणु दिशा रडत होत्या. ३२८ उय' (उत) उदाह, उयाहु (उताहो)
(१) विकल्प, किंवा :- (१) एवं किं साहावियरूवं उय कोववसेण कयमेवं। (सुपास ४९३) असे काय स्वाभाविक रूप आहे अथवा रागाने असे केले आहे? (२) संदिसहणं सामी तं दारगं अहं एगं ते उज्झामि उदाह मा। (निरया पृ. १०) स्वामी त्या मुलाला एकांतांत टाक अथवा नको ते सांगा. (३) सेवं मम करेह उयाह रज्जाणि मुय (कथा पृ. ५३) माझी सेवा करा अथवा राज्ये सोडा.
(२) प्रश्नात :- (१) तुम्हे किं सरीरबाहिं फेडेह उदाहु कम्मबाहिं। (पाकमा १ म्मिव-मिव-विआ इवार्थे। प्रा.प्र. ९.१६; मिव पिव विव व्व व विअ इवार्थे वा। हेम
२.१८२ २ उत प्रश्ने वितर्के स्थादुतात्यर्थविकल्पयोः।