________________
३५४
अर्धमागधी व्याकरण
(२) एयं पि तए न सुयं आ पावे। (नल पृ. ४५) पापी स्त्रिये, हे सुध्दा तू ऐकलेले नाहीस?
(२) खेद :- (१) आ कहमवज्झो नाम। (समरा पृ.७२४) आः। कसा बरे
अवध्य ? (२) आ कहमणायत्तो नाम। (समरा पृ.७२६) आः। कसा बरे स्वाधीन नाही? ३२५ आमं (आम)
होकार, स्वीकार :- (१) सो भणइ - देव आमं। (सुपास ५२८) तो म्हणतो 'होय, महाराज' (२) भयवया भणियं-आम। (समरा पृ.३४३) भगवंताने म्हटले ठीक आहे. (३) मए भणियं-आमं। (कथा पृ.१४५) मी होय म्हटले. ३२६ इइ', इ, इय, ति, त्ति (इति)
(१) ग्रन्थान्त, प्रकरणान्त :- (१) इइ पढमो पत्थावो। (महा पृ.७अ) पहिला प्रस्ताव समाप्त झाला. (२) इय... वद्धमाणचरिए बीय-पत्थावो। (महा पृ.२८अ) महावीरचरित्रातील दुसरा प्रस्ताव समाप्त.
(२) वक्त्याचे प्रत्यक्ष शब्द उद्धृत केल्यावर :- (१) भणियं कुमारेणकिमेयंति। (नल पृ.४५) 'काय हे' असे कुमाराने म्हटले (२) पुच्छिओ इसिणा कुओ भवं आगओ त्ति। (समरा पृ.१०) आपण कोठून आला असे ऋषीने विचारले.
(३) असे, अशाप्रकारे :- (१) उसभो त्ति पइट्ठियं नामं (महा पृ. २.१०) ___उसभ असे नाव ठेवले. (२) तओ मओ त्ति नाऊण गया ते। (बंभ पृ.५६) मग (तो) मेला असे वाटून ते गेले.
(४) अशा दृष्टीने :- (१) तेण वुत्तं - महारायनलस्स पत्ति त्ति मे पूयणिज्जासि। (नल पृ. १६) त्याने म्हटले “(तू) महाराज नलाची पत्नी (आहेस), या दृष्टीने (तूं) मला पूज्य आहेस."
१ २
आम अभ्युपगमे। हेम २.१७७ इति स्वरुपे सान्निध्ये विवक्षानियमे मते। हेतौ प्रकारप्रत्यक्षप्रकाशेऽप्यवधारणे।। एवमर्थे समाप्तौ स्यात् ।।