________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
(२) अहो अणुरूवो इमाण संजोगो । (सिरि १६०) छान! यांचा संयोग अनुरुप आहे।
३५३
(४) आश्चर्य :- (१) अहो जिणधम्मसामत्थं । (चउ पृ. १४) काय हे जिनधर्माचे सामर्थ्य! (२) अहो अउव्वो तक्करो। (समरा पृ. ४९१ ) अहो ! चोर मोठा अपूर्व आहे।
(५) किती : (१) अहो महुरिमा रूवस्स । ( नल पृ. २२) रूपाचे किती माधुर्य! (२) अहो उदारया कुमारस्स । (नल पृ ४५) किती (ही) कुमाराची उदारता !
(६) पश्चात्ताप :- (१) अहो दारुणं अकज्जं मए पावकम्मेण अणुचिट्ठियं । (समरा पृ. १५) अरेरे! म्यां पापकर्माने दारुण अकार्य केले ।
:
(२) अहो इह परलोगसुहावहो न मए पावेण कओ गुरूवएसो। (धर्मो पृ. १८१) अरेरे! इह पर लोकी सुखावह असा गुरुपदेश म्या पाप्याने आचरला नाही। ३२३ आ (१) पर्यंत (१) आ जम्म दुक्खिया होज्ज एसा । (महा पृ. ९२ अ) ही आजन्म दुःखी होईल. (२) आजाणु कुसुमवुट्ठी निवडइ गयणाओ । (महा पृ. २५१ ब) गुडघ्यापर्यंत (पोचेल इतकी) पुष्पवृष्टि आकाशातून पडली. (२) पासून :- किं तु न सरेमि किंचिवि अवराहं आ विवाहाओ । (सुपास ६०१) परंतु, विवाह झाल्यापासून (मी) कोणतातरी अपराध (केला आहे हे) मला आठवल नाही.
(३) किंचित् :- (१) आरत्तकरचरणकमला। (नल पृ. ३) किंचित् लाल कर-चरण कमले असणारी. (२) आपंडुर मुहकमला। (सुर ३.१८६) किंचित् पांडुर मुखकमल असणारी.
४) उपसर्ग असता पर्यंत, वर इत्यादी अर्थ : उदा. आरुहइ, आपुच्छइ, आमंतेइ, आगच्छइ इत्यादी.
३२४ आ (आ:)
(१) राग :
मागे शब्दयोगी अव्यये, परिच्छेद २५१ पहा.
१
(१) आ दुरायारे। (समरा पृ. ५५८) अग दुराचारी स्त्रिये.