________________
३५२
(२) अह नो एत्तो उवसग्गाओ मुच्चिस्सामि । ( अंत ११४) जर या उपसर्गातून
माझी सुटका झाली नाही.
अर्धमागधी व्याकरण
(अ) अहव, अहवा (अथवा ) विकल्प दर्शविण्यास किं जीवइ अहव मुया मह कंता । (नाण ५.८५) माझी कांता जिवंत असेल की मेली असेल ?
:
३२१ अहह '
(१) आनंद :- अहह मई निम्मला तुज्झ । (महा पृ. ७७ अ) छान ! तुझी बुद्धि (किती) निर्मल आहे ।
(२) आश्चर्य :- अहह अणब्भा वुट्ठी संजाया अज्ज पुण्णेहिं। (सुपास ६५०) अहा! आभाळ नसता आज पुण्यामुळे वृष्टि झाली.
(३) त्रास, खेद (१) अहह अविवेय पसरो । ( सुपास ६०३ ) अरेरे! (काम हा) अविवेकाचा विस्तार ! ( २ ) अहह महापावो हं । ( महा पृ. २८१ अ) अरेरे! मी महापापी आहे ।
(४) परिक्लेश :- अहह महापावो कहं जिणं पि मिच्छं समीहए काउं । (महा. १५३ ब ) अरेरे ! जिनाला सुद्धा खोटे पाडण्याची ( हा) महापापी कशी इच्छा करतो?
३२२ अहो
(१) संबोधन :- (१) अहो जणा । (समरा पृ. २१५) लोकहो (२) अहो भाय कहसु किं पि अपुव्वं अक्खाणयं । ( महा पृ. १०५ अ) अरे भाऊ, कोण तरी अपूर्व असे आख्यान सांग.
(२) दुःख, विषाद, शोक :- (१) अहो दुक्खो हु संसारो । ( उत्त १९.१५ ) संसार दुःखरुप आहे। (२) अहो महामंदभागिणो अम्हे । (महा पृ. १३६ अ) अरेरे। आम्ही फार दुर्दैवी आहोत. (३) अहो असोहणं कयं कुमारेहिं। (महा पृ.४६ अ) अरेरे! कुमारांनी वाईट केले.
(३) आनंद :- (१) अहो सुवरियं । (नल पृ. ५) वा! छान निवड केली ।
१
२
अत्यद्भुते खेदे परिक्लेशप्रकर्षयोः । अहो धिगर्थे शोके च करुणार्थविषादयोः । सम्बोधने प्रशंसायां विस्मये पादं पूरणे ।।