________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३५१
(५) अनुताप, पश्चात्ताप :- (१) अव्वो जीए कएण भाया वावाइओ सा वि देवी न जाया। (धर्मो पृ. २१६) अरेरे! जिच्यासाठी भावाला मारले तीही राणी झाली नाही. (२) अव्वो लहुओ वि लहुईओ मए अप्पा। (धर्मो पृ. १५) अरेरे! लघु आत्मा मी आणखीच क्षुद्र केला.
(६) संभाषण, संबोधन :- अव्वो पि असहि पेच्छसु। (अग प्रियसखीपहा) ___ (७) भय :- (१) अव्वो किं पागफलभक्खणं पिव ण सुंदरा एसा। (धर्मो. पृ. ५२) किं पाग फळाच्या भक्षणाप्रमाणे ही चांगली नाही. (२) नर ओवमं खु दुक्खं अव्वो तिरिएसु सव्वेसु। (धर्मो पृ १५१) सर्व खालच्या प्राण्यांत खरोखर नरकाप्रमाणे दुःख आहे.
(८) खेद, खिन्नता :- छलिओ अहं पि अव्वो। (धर्मो.पू. ४९) अरेरे! मलाही फसविले.
(९) दुःख :- अव्वो तम्मेसि कसि। (कुमार ४.१४) का त्रास देतोस?
(१०) अपराध :- अव्वो अन्नासत्तो। (कुमार ४.१४) अ.य स्त्रीच्या ठिकाणी आसक्त आहे.
(११) आदर :- अव्वो सो एइ। (कुमार ४.१५) तो येत आहे. (१२) विषाद :- (१) अव्वो जणओ वि एरिसं कुणइ अवमाणं पुत्ताणं। (सुर २.२०७) अरेरे! बाप सुद्धा पुत्रांचा असला अपमान करतो.
(२) अव्वो अदूसहं समणुभूयं। (सुर १३.१) अरेरे! अति दुःसह अनुभवले. ३२० अह (अथ)
(१) आरंभ : अह बिइओ पत्थावो। (महा) आता दुसरा प्रस्ताव (सुरु) (२) नंतर, त्यानंतर :- (१) अह पुच्छइ गोयमं राया। (पउम ३.७) नंतर राजाने गौतमाला विचारले. (२) अह कुमरेण भणियं। (धर्मो पृ. १०) त्यानंतर कुमाराने म्हटले.
(३) आणि, व :- अत्थ चोरा विलुपंति उद्दालंति नरेसरा। वंतरा य निगृहंति गेण्हंति अह दाइया।। (चउ पृ. २२) चोर पैसा लुबाडतात, राजे काढून घेतात, व्यंतरदेव लपवितात आणि नातेवाईक (काढून) घेतात.
(४) जर : (१) सुयणो न कुप्पइ च्चिय अह कुप्पइ मंगुलं न चिंतेइ। (वज्जा. ३४) सज्जन रागावतच नाही जर रागावलाच तर वाईट चिंतत नाही.