________________
३५०
अर्धमागधी व्याकरण
भावांना विपुल भोग दिले. (२) राया चउण्ह वि आसमाणं गुरु। (कथा पृ. ११०) राजा चारही आश्रमांचा गुरु आहे.
(८) 'क' या सर्वनामापुढे ‘अवि' आल्यास
(अ) कोणीतरी', काही, हा अर्थ :- के विसमणा उज्जाणे आगया अज। (संपइ २.७) आज काही श्रमण उद्यानात आले आहेत.
(आ) कधी अनिर्वचनीयता सूचित होते.
(क) अवि य (अपि च) :- समुच्चयदर्शक वाक्ये जोडण्यास उपयोग होतो.२
कधी, ‘अवि य' ने विरोध दर्शविला जातो. उदा.:- न एवं एएसिं सुहं होइ अवि य अहिययरं दुहं। (समरा पृ. २०३) अशात-हेने यांना सुख होणार नाही, पण अधिक दुःख मात्र होईल.
(ख) तहा वि, तहवि :- दोन विरोधदर्शक वाक्ये जोडण्यास उपयोग होतो. ३१९ अव्वो
(१) विस्मय, आश्चर्य :- (१) अव्वो हु अवि तहं तं पिच्छह नेमित्तियस्स सुमइस्स। (सुर ११.१३२) अरेच्चा! सुमति ज्योतिषाचे ते (भविष्य) खरे ठरले! ते पहा (२) अव्वो किं पुण एयागया। (धर्मो पृ. ४८) अरेच्चा! ही पुनः का आली?
(२) आनंद :- अव्वो एयाए मंजूसाए जमित्थ सारभूयं तं हविस्सइ। (धर्मो पृ. १३९) छान! जे येथे मौल्यवान आहे ते या पेटीत असणार।
(३) सूचन :- अव्वो निद्दामोहेणेवं पलवइ। (धर्मो पृ. १४७) अरे! निद्रामोहाने असे बडबडत आहे.
(४) वितर्क :- अव्वो किं तं अलियं होही इह देवयावयणं। (सुर ४.२२२) काम, ह्या बाबतीत देवतेचे वचन काय खोटे होईल?
१ २
मागे परिच्छेद ३०६ पहा. वाक्ये जोडणे प्रकरण २९ पहा अव्वो विस्मयसूचनसम्भाषणखिन्नतानुतापेषु । मार्क ८.२३; अव्वो सूचना दु:ख सम्भाषण-अपराधविस्मय-आनंद-आदर-भयखेदविषादपश्चात्तापे। हेम २.२०४
eu