________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३४९
३१७ अलाहि
निवारण, निषेध :- (१) अलाहि परिहासेण। (महा पृ.२२० अ) परिहास पुरे (२) अलाहि संकाए। (धर्मो पृ. ३९) शंका नको. ३१८ अवि', वि, पि (अपि)
(१) सुद्धा :- (१) सो वि राया तवं चरे। (उत्त १८.३७) त्या राजाने सुध्दा तप केले. (२) पुरिसुत्तमं पि लच्छी छड्डइ। (महा. २.२०९) पुरुषोत्तमाला सुद्धा लक्ष्मी टाकते.
(२) सुद्धा एकाद्याच्या दृष्टीने :- (१) धणसिरी वि गिहसामिणी जाया। (कथा पृ. २१) धणसिरी सुद्धा गृहस्वामिनी झाली. (२) पउमसिरी वि जाया अग्गमहिसी। (कथा पृ.२१) पउमसिरी सुद्धा पट्टराणी झाली.
(३) प्रश्न विचारताना :- (१) कुमार, अविकुसलं महारायस्स। (समरा पृ.३२८) कुमार! महाराजांचे कुशल आहे (ना) ? (२) वच्छ, अवि कुसलं ते तायस्स। (समरा पृ. ५५.३) बाळा! तुझ्या वडलांचे कुशल आहे (ना)? ।
(४) संशय, अनिश्चितता :- (१) अवि नाम एयमवि एवं हवेज। (समरा पृ. ६२६) हे सुद्धा असे असेल काय बरे? (२) अज, अवि सुमरेसि मं। (समरा पृ. ४३१) आर्या! माझी आठवण आहे?
(५) आशा, अपेक्षा :- यावेळी अवि पुढे प्राय: 'नाम' हा शब्द असतो:अवि नाम पुजंतु से मणोरहा। (समरा पृ. ५६०) (माझी इच्छा आहे की) त्याचे मनोरथ पूर्ण व्हावेत.
(६) 'जरी' या अर्थी विरोध दर्शविण्यास :- (१) गिही वि सो केवली जाओ। (कुम्मा १३९) घरात राहूनसुद्धा तो केवली झाला. (२) न लिप्पए भवमज्झे वि संतो। (उत्त ३२.३४) संसारात असला तरी तो लिप्त होत नाही.
(७) संख्यावाचकानंतर ‘अवि' आल्यास सर्व असा अर्थ होतो. (१) भाउयाण चउण्ह वि दिन्ना विडला भोगा। (कथा पृ. ५०) चारही
१
अलाहि निवारणे. हेम. २.१८९ अपि संभावना प्रश्न शङकागर्हासमुच्चये। तथायुक्तपदार्थेषु कामचार क्रियासु च।।