________________
३४८
२.९५) तो देवांना सुद्धा पूज्य होतो, मग माणसांच्या बाबतीत जास्त काय
बोलावे?
३१२ अदु, अदुव, अदुवा
या तीन्हींचाही ' अथवा ' या अर्थी उपयोग होतो.
(१) काएण वाया अदु माणसेणं । (दस ११.१८) कायेने, वाचेने अथवा मनाने (२) देवा अदुव माणुसा । (सूय १.११.३) देव वा माणसे (३) इमम्मि लोए अदुवा परत्था। (उत्त ४.५ ) या लोकात वा परलोकात. ३१३ अम्मो
अर्धमागधी व्याकरण
आश्चर्य दर्शविण्यास :- अम्मो एरिसं पि कसिणभंसणं माणुसाणं रूवं होइ । (नल पृ.४) माणसांचे सुद्धा असले काळे व भीषण रूप असते ? ३१४ अम्हो'
(१) संबोधन :- अम्हो बम्हण। (उसा २.७१) अरे ब्राह्मणा ! (२) सूचना :- अम्हो साहसिओ पिओ । (प्रियकर साहसी आहे) ३१५ अरे
(१) संबोधन :- अरे दुरायारा। (नल पृ.१६) अरे दुराचाऱ्यानो !
(२) रतिकलह :- अरे मए समं मा करेसु उवहासं । (अरे माझ्याशी उपहास करु नको.)
३१६ अलं
(१) निषेध, निवारण, पुरे :- अलं विसाएण विसालणेत्ते। (उसा १.२८) हे विशालनेत्रे, विषाद करु नको.
१
२
:
(१) समर्थ, योग्य (१) नालं ते मम ताणाय । (उत्त ६. ३) ते माझे रक्षण करण्यास समर्थ नाहीत (२) अलमप्पणो होंति अलं परेसिं । (सुय १.१२.१९) स्वत:चे व दुसऱ्याचे रक्षण करण्यास समर्थ होतात.
३
४
अम्मो आश्चर्ये । हेम २. २०५
अम्हो दुःखसूचनासम्भाषणेषु.। प्रा.मं. ८.१२
प्रा. मं. ८.१२
रे अरे! संभाषणरतिकलहे । हेम. २.२०१