________________
प्रकरण २२
अव्ययांचे उपयोग
BRCAERIAERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
३०९ अव्ययांचे उपयोग
सर्वच
संस्कृतमध्ये काही काही अव्ययांचे विविध उपयोग आढळतात. अर्धमागधीत आढळतात असे नाही जे आढळतात ते पुढे दिले आहेत. या खेरीज प्राकृतमध्येच आढळणारी अशी काही अव्यये आहेत. त्यांचेही उपयोग पुढे दिले आहेत.
३१० अइ
(१) संभावन :- अइ दिअर किं न पेच्छसि । भावोजी ! पहात नाही काय ?
(हेम.)
:
(२) संबोधन : पहिय अइ अम्ह पासे भुंजह । (सुपास ५०१ ) अरे पथिका! आमच्याजवळ ( येऊन) जेव.
३११ अंग
(१) संबोधन :- दुल्लभे सवणयाए किमंग पुण पासणयाए। (पएसिपरि-२१) ऐकण्यास सुद्धा दुर्लभ, मग अहो पहाण्याच्या बाबतीत काय सांगावे ? ) (अ) किमंग :- जास्त काय सांगावे ?
(१) देवा वि परिकिलेस भाइणो हवंति किमंग पुण मच्चलोयवासी जणो । (समरा पृ. २०८) देवसुद्धा दुःखभागी होतात मग मर्त्यलोकवासी जनांबद्दल जास्त काय सांगावे? (२) सो देवाण वि पुज्जो किमंग पुण मणुयलोयस्स । (नाण
१
२
अइ संभावने । हेम २. २०५
:
याबद्दल अभयदेव (नाया (पोथी) पृ.४८ ब) असे म्हणतो अंग इति आमंत्रणे, अथवा परिपूर्ण एवायं शब्दः विशेषणार्थः।