________________
३४६
अर्धमागधी व्याकरण
(१) जलहिं मं जाण। (नाण १.२०१) समुद्र तो मी हे जाण (२) मं मन्नसु भत्तारं। (सुपास ५३८) मला पति मान (३) तं धम्म भणंति बुहा। (सुपास ४९९) त्याला शहाणे धर्म म्हणतात.
(इ) प्रयोजक धातु :
(१) सर्व प्रयोजक धातु सकर्मक बनतात. क्रिया दुसऱ्याकरवी करविणे हा अर्थ प्रयोजकाने दाखविला जातो.
(१) नेवन्नेहिं मुसं वयावेजा। (दस ४) दुसऱ्यांकडून खोटे बोलवू नये. (२) चंदाइच्चबइल्ला कालरहट्टं भमाडेंति। (समरा पृ. २३८) चंद्रसूर्यरुपी बैल कालरुपी रहाट फिरवितात.
(२) कधी मूळ धातूच्या अर्थानेच प्रयोजक धातूचा उपयोग केलेला आढळतो.
(१) आवासिओ बाहिरुज्जाणे। (धर्मो पृ.११९) बाहेरच्या उद्यानात रहिला. (२) समीहियकजं सव्वं कारेमि। (अगड. १११) सर्व इच्छित कार्य मी करीन.
(३) कधी मूळ धातूचा उपयोग प्रयोजक धातूसारखा केलेला आढळतो.
(१) पहियाणं दलइ हिययाई। (सुर २.९१) वाटसरूंची हृदये फोडने (२) कीलामि य जयसेणं तत्थ अहं विविहकीलाहिं। (सुर १.१९२) आणि तेथे मी जयसेणाला विविध क्रीडांनी खेळवीत असे. __ (ई) अर्धमागधीत कधी कर्मणि धातु कर्तरि अर्थी वापरलेले आढळतात.
(१) वयं च वित्तिं लब्भामो। (दस ९.४) आणि आम्ही निर्वाहाचे साधन मिळवितो. (२) सव्वजीवा वि इच्छंति जीविउं न मरिजिउं। (दस ६.११) सर्व जीव जगण्याची इच्छा करतात मरण्याची नाही. (३) सत्थीकओ वि कुमरो मुच्छिज्जइ। (सुरः १५.९८) स्वस्थ केले तरी कुमार मुर्छित झाला.
(उ) जोर देण्यास आज्ञार्थी क्रियापदाची द्विरुक्ति केली जाते.
(१) भो संभूय उवसमसु उवसमसु को वाणलं। (बंभ पृ. ३३) हे संभूता, कोपानल शांत कर शांत कर (२) भो महाभाय पेच्छ पेच्छ। (बंभ पृ. ५७) भल्या माणसा! पहा पहा.
१
ही क्रियापदे अशी :- नाव ठेवणे, म्हणणे, निवडणे, करणे, नेमणे, जाणणे, मानणे वा समजणे इत्यादी