________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
३४५
जाते. (२) सारहिं इणमब्बवी। (उत्त २२.१५) सारथ्याला असे म्हणाला. (३) धम्मं काऊण इहं पाविहिसि सुरालए परमसोक्खं। (पउम ३३.४४) धर्म (आचरण) करुन येथे व स्वर्गात परमसौख्य पावशील. (४) पूरेसु मणोरहं मज्झ। (महा पृ. १४३ अ) माझा मनोरथ पूर्ण कर. (५) तं तितिक्खे परीसह। (उत्त २.१४) ता परीसह (त्रास) सहन करावा.
(आ) (१) काही सकर्मक क्रियापदे दोन कर्मे घेतात.
(१) पभणह तुम्हे निय नायगं इमं वयणं। (सुपास ५७०) तुम्ही आपल्या नायकाला हे वचन सांगा. (२) तओ नमिं रायरिसिं देविंदो इणमब्बवी। (उत्त ९.११) नंतर नमिराजर्षीला देवेंद्र हे (वचन) बोलला.
(२) होणे, असणे, दिसणे इत्यादी अकर्मक क्रियापदांना पूरक लागते. हे पूरक नाम वा विशेषण असू शकते.
(१) मम भत्ता कणयगोरो आसि। (जिन पृ.२७) माझा पति सुवर्णाप्रमाणे गोरा होता. (२) पयईए वि हु पणयवच्छला हुंति सप्पुरिसा। (महा.पृ. १२६ ब) सत्पुरुष हे प्रकृतीनेच खरोखर प्रणतवत्सल असतात. (३) किं आउलो ता य लक्खिजसि अज तुम। (सुपास ५८८) बाबा! तुम्ही आज आकुल कां दिसता?
(३) काही अकर्मक क्रियापदांना सद्दश (cognate) कर्म दिलेले आढळते. (अ) सो तवं तप्पइ। (जिन पृ. ३) तो तप तपतो (करतो)
(आ) अकर्मक क्रियापदाचा क्वचित् सकर्मकाप्रमाणे उपयोग केलेला आढळतो.
(१) ताहे रण्णं परिवसंति। (पउम ३.१४१) मग (ते) वनात राहिले. (२) विहरइ वसुहं संवच्छरं धीरो। (पउम ३.१३९) वर्षभर तो धीर पृथ्वीवर हिंडला.
(४) काही सकर्मक क्रियापदांनाही पूरक लागते.
अकर्मक क्रियापदाची क्रिया व तिचे फळ हे कर्त्यावर असतात. खालील अर्थाचे धातु प्रायः अकर्मक आहेत लज्जा-स्थिति जागरणं वृध्दि-क्षय-भय-जीवित-मरणम्। शयन-क्रीडा-रुचि-दिप्त्यर्था धातव एते कर्मविहीनाः।। कातंत्र व्याकरण. लाजणे, असणे, रहाणे, जागणे, वाढणे, झिजणे, भिणे, जगणे, मरणे, निजणे, खेळणे, आवडणे आणि प्रकाशणे हे व ह्या अर्थाचे धातु अकर्मक असतात. इंग्रजीत - she sighed a deep sigh
२