________________
३४४
अर्धमागधी व्याकरण
आहे. (४) कुलमहिहराण पढमो मेरु । (लीला. २७३ ) कुल पर्वतांत मेरु श्रेष्ठ. (१३) काही विशेषणांचे पुढीलप्रमाणे विशिष्ट उपयोग होतात.
(अ) आदरपूर्वक बोलताना प्राय: महाभाग, महाणुभाव, देवाणुप्पिय यांचा उपयोग केला जातो.
(१) कहसु मह महाभाग । (सुर १०.४९) महाभागा ! मला सांग.
(२) ता आगच्छउ ताव सो महाणुभावो। (समरा पृ.२३) तेव्हा तो महानुभाव प्रथम येऊ दे (३) अह केवलिणा भणियं - देवाणुपिए निसामेसु। (सुर १५.१९६) मग केवलीने म्हटले - 'देवानुप्रिये, ऐक'.
(आ) भद्द, भद्दमुह यांचा सर्वसाधारणपणे उपयोग केला जातो.
(१) भद्द अलं विसाएण । (समरा पृ. १९८ ) भल्या माणसा ! विषादपुरे (२) भद्दमुह मा निक्कारणं कुप्पाहि । (कथा पृ. ११३) भद्रमुखा ! उगीच रागवू
नकोस.
(इ) भंत, भगवंत यांचा उपयोग माननीय जनाशी बोलताना केला जातो. (१) मम भंते कुओ विणासो । (कथा पृ. ८५) महाराज ! माझा नाश कोठून ? (२) भयवं करेह पसायं । (समरा. पृ. २३) भगवन्! कृपाप्रसाद करा. (ई) लहानाशी बोलताना 'जाय' चा उपयोग केला जातो.
जाय अज्ज तए इहेव भोत्तव्वं । (समरा पृ. १८७) बाळा! आज तू इथेच भोजन करावेस.
३०८ क्रियापदांचे उपयोग
(अ) (१) एकादी वस्तु वा व्यक्ती याबद्दल काहीतरी सांगणारा विधान करणारा-शब्द म्हणजे क्रियापद असल्याने वाक्यात क्रियापद उद्देश्याची स्थिती वा क्रिया दर्शविते.
(१) साहूण दंसणं पि हु नियमा दुरियं पणासेइ । (समरा पृ. ६४१) साधूंचे दर्शनसुध्दा निश्चितपणे दुरिताचा नाश करते. (२) न हि विधुरसहावा हुंति दुत्थे वि धीरा। (नल पृ.१०) दु:स्थितीत सुद्धा धीरांचा स्वभाव विधुर होत नाही.
(२) वाक्यास पूर्णता आणून वक्त्याच्या दृष्टीने अपेक्षित असणारा काळ वा अर्थ याचा बोध क्रियापदावरुन होतो.
(१) कत्तारमेव अणुजाई कम्मं । ( उत्त १२.२३) कर्म कर्त्याच्या मागोमाग