________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
३४३
उपयोग क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो. उदा. द्वितीया ए.व. :- लहुं (हळु), खिप्पं (लवकर), मंदं (हळु), फुडं (स्पष्टपणे), सिग्घं (लवकर), निच्चं (नित्य), सययं (सतत), गाढं, निस्संदिद्धं (नि:संदिग्धपणे), सायरं (सादर), अहियं (अधिक), चिरं, अवस्सं (अवश्य), अच्चंतं (अत्यंत) तृतीया ए.व. :दूरेणं, चिरेण, अचिरेण, चतुर्थी ए.व. :- चिरा, अचिरा, षष्ठी ए.व.:- चिरस्स, सप्तमी ए.व. :- दूरे, अंतिए, समीवे, अग्गे इत्यादी.
(९) तर वाचक विशेषणांचा उपयोग तुलनेत केला जातो त्यांना पंचमी विभक्तीची अपेक्षा असते.
(१) न य इमाओ अन्नं सुंदरयरं। (समरा पृ. ४८९) आणि याहून दुसरे काही अधिक सुंदर नाही. (२) जीवियाओ वि इट्टयरो। (समरा. पृ. ३६२) जीवितापेक्षा अधिक इष्ट.
(१०) अब्भहिय, अहिय, हीण, ऊण इत्यादी विशेषणांचा तर वाचकांप्रमाणे उपयोग होतो.
(१) जीवियाओ य अब्भहिओ। (समरा पृ.२३२) आणि जीवितापेक्षा अधिक. (२) तुह तिव्व-तव-जणिय-सरीरपीडाओ वि मे अहिया सरीरपीडा। (समरा पृ.२३) तीव्रतपाने होणाऱ्या तुझ्या देहाच्या पीडेपेक्षा माझ्या शरीराची पीडा अधिक आहे. (३) केण उण अहं भवओ ऊणओ। (समरा पृ. ४०९) पण तुझ्यापेक्षा मी कशात बरे कमी आहे? (४) किं अम्हे वि तुज्झ विहीणा। (कथा पृ.८३) आम्हीसुध्दा काय तुझ्यापेक्षा हीन आहोत?
(११) अनेकांतून एकाचे महत्त्व वा कनिष्ठत्व दाखविण्यास तमवाचक विशेषणाचा उपयोग होतो, षष्ठी' वा सप्तमी यांची अपेक्षा असते.
(१) सव्वाण वि उत्तमा पुरंधीणं। (नाण ३.१५) सर्व स्त्रियात उत्तम. (२) वणेसु वा नंदणमाहु सेठें। (सूय १.६.१८) वनात नंदनवनाला श्रेष्ठ म्हणतात.
(१२) पवर, पढम यांचा तमवाचक विशेषणाप्रमाणे उपयोग होतो. (१) सीहे मियाण पवरे। (उत्त ११.२०) सिंह हा पशूत श्रेष्ठ.
(२) पवरो पउराण। (सुर १.७३) नागरीकांत श्रेष्ठ (३) एसो पंचणमुक्कारो मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवइ मंगलं। हा पंचनमस्कार सर्व मंगलांत श्रेष्ठ मंगल १ षष्ठी व सप्तमी या विभक्तींचे उपयोग पहा.