________________
३४२
अर्धमागधी व्याकरण
(३) अकर्मक क्रियापदाचे पूरक म्हणून विशेषणाचा उपयोग होतो. (१) वसणम्मि अणुव्विग्गा विहवम्मि अगव्विया भये धीरा । होंति अभिण्ण सहावा समम्मि विसमम्मि य समत्था ।। (धर्मो पृ. १९८) संकटकाली अनुद्विग्न, वैभवस्थितीत गर्वरहित, भयाचे परिस्थितीत धीर आणि चांगल्या वा वाईट परिस्थितीत समर्थ हे अभिन्न स्वभावी असतात. (२) अइरहस कयकज्जाई पज्जं तदा तणाइं हवंति। (महा पृ. ५० ब) फार घाईने केलेली कामे परिणामी दारुण होतात.
(४) सकर्मक पण अपुरे विधेय असणाऱ्या क्रियापदांचे पूरक म्हणून विशेषणांचा उपयोग होतो.
(१) कुणसु निव्विसं एयं । (पाकमा पृ. २३) याला निर्विष कर. (२) निरत्थयं रज्जं मन्नामि। ( धर्मो पृ. १२५ ) मी राज्य निरर्थक मानतो.
(५) विधेय म्हणून विशेषणाचा उपयोग होतो; यावेळी 'असणे' क्रियापद उक्त वा अनुक्त असते.
(१) दुलहा विसुद्धबंभयारिणो । (धर्मो पृ. ३६) विशुद्ध ब्रह्मचारी दुर्लभ आहेत. (२) न य विसयासत्ताण दुल्लहाओ आवयाउ त्ति । (धर्मो पृ.१०३) आणि विषयासक्तांना आपदा दुर्लभ नाहीत.
(६) विशेषणाच्या द्विरुक्तीने आधिक्य, पृथक्त्व यांचा बोध होतो. (अ) आधिक्य :- (१) मया मया सद्देण । ( विवाग पृ. ७) मोठमोठ्या आवाजाने (२) महामहंतो अक्कंदो । (सुपास ५६४) फार मोठा आक्रंद
(आ) पृथक्त्व : (क) (१) सहिंतो २ गिहिंतो । (विवाग पृ.८) आपापल्या घरातून (२) सएहिं २ काएहिं । (नाया पृ. ६५ ) आपापल्या देहात (३) नियनिय पुत्रे ठावह निययपए) (कथा पृ. १०) आपापल्या पदी आपापल्या पुत्रांना ठेवा. (ख) दुवे दुवे। (दोन दोन ) याचप्रमाणे चत्तारि २, अट्ठ २, सोलस २, अट्ठट्ठ नाडयाइं । (पउम. २.५१) आठ आठ नाटके.
(७) 'संति य' या विशेषणाचा चा-ची-चे या अर्थी उपयोग केला जातो. (१) एसा सा मज्झ संति या मुद्दा । (सुर ६.७८) हीच ती माझी मुद्रा. (२) जं जस्स संति यं दव्वं । (समरा पृ. २२३) जे ज्याचे द्रव्य. (८) काही विशेषणांच्या द्वितीया ते सप्तमी पर्यंतच्या एकवचनी रुपांचा