________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
(७) अन्न, पर यांच्या द्विरुक्तीने परस्पर संबंध सूचित होतो. (१) अन्नोन्नं पहरंता। (जिन पृ. २०) परस्परावर प्रहार करणारे. (२) एवं परोप्परं जुज्झिराण तेसिं। (महा पृ. ५७अ ) अशाप्रकारे परस्पर युध्द करणाऱ्या त्यांचे (३) अवरोप्परओ पीई । (सुपास ४११ ) परस्पर
प्रीति.
(८) अन्न-अन्न : एक-दुसरा असा अर्थ होतो.
पिए न एस अम्हाण कुलक्कमो जं अण्णम्मि पुव्वपविट्ठे अण्णो वि पविसइ। (धर्मो पृ. १२५) प्रिये, एक प्रथम प्रविष्ट झाला असता दुसऱ्याने ही तेथे प्रवेश करावा, असा आमचा कुल क्रम नाही.
(९) ज, त आणि क यांच्या काही विभक्तींच्या एकवचनी रुपांचा उपयोग अव्ययाप्रमाणे केला जातो. उदा :- जेण- तेण (ज्याअर्थी - त्याअर्थी), जम्हातम्हा, कम्हा (कारण) इत्यादी. ३०७ विशेषणांचे उपयोग
(१) नामांबद्दल विशेष माहिती देण्याचे कार्य विशेषणे करतात.
(१) सुंदरधम्मरयाणवि विसमं विहिविलसिमं समावडइ । (सुपास ५१० ) चांगल्या धर्मांत रत असणाऱ्यांवर सुध्दा दैवाचा विषम खेळ आदळतो. (२) रागानलपज्जलिओ कज्जाकज्जं न पेच्छए पुरिसो। (धर्मो पृ.१९७) रागरूपी अग्नीने पेटलेला पुरुष कार्याकार्य पहात नाही.
(२) नुसत्या विशेषणाचा कधी विशेष्याप्रमाणे उपयोग होतो.
(१) चउत्थो तत्थेव ठिओ। (अरी पृ. ७) चौथा तेथेच राहिला. (२) जाणता विहु अलिय मुहप्पिय चेव जंपंति । (सिरि १०४) जाणते सुध्दा मुखावर प्रिय असे खोटे वचन बोलतात (३) सेसा दुक्खाणि पावंति। (पउम ३३.४३) उरलेले दुःख पावतात.
(अ) संख्या विशेषणे कधी नामाप्रमाणे वाक्यात उद्देश म्हणून वापरली
जातात.
३४१
१
दो वि मया संता। (बंभ पृ. २६) दोघेही मृत झाले असता.
यावेळी त्यांचे ए. व. असते, उपयोग प्रायः क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे असतो.