________________
३४०
अर्धमागधी व्याकरण
होतो. उदा. (१) सीयंति एगे बहुकायरा नरा। (उत्त. २०.३८) काही अती भित्रे नर गलित गात्र' होतात (२) अन्ने ‘विण्ह पहाणो' त्ति भणंति। (पाकमा पृ.४०) दुसरे ‘विष्णु प्रधान (मुख्य) असे म्हणतात. (३) अवरे ‘महेसरो उत्तमदेवो' त्ति भणंति (पाकमा पृ. ४०) काही ‘महेश्वर हा उत्तम देव' असे म्हणतात.
(२) ‘कयर' (कतर) चा ‘कोणता' या अर्थी उपयोग होतो. __(१) कयरे ते खलु बावीस परीसहा। (उत्त २) ते बावीस परीसह कोणते? (२) कमरो इमो पएसो। (अगड २७५) हा प्रदेश कोणता?
(३) इयर' (इतर) :
एगे दूसिंति गुणे इयरे दोसे वि छायंति। (जिन पृ.१) काही गुणांना दोष देतात, तर इतर दोष सुध्दा झाकतात.
(४) एगयर :- कोणीही एक :
एयाणं एगयरं उवभुंजसु नत्थि अन्नहा मोक्खो। (सुप स. ४८७) यातील कोणतेहि एक खा नाहीतर सुटका नाही.
(५) अन्नयर :- कोणीही, कोणताही:(१) अन्नयरेणं धम्मेणं। (सूय. २.१.९) कोणत्यातरी धर्माने (२) अन्नयरेसु देवलोएसु। (सूय. २.२.२४) कोणत्याही देव लोकात. (६) 'एग' चा कधी 'केवल', असाही अर्थ होतो.
संसारे जीवाणं एक्को नरवर हिओ धम्मो। (जिन पृ.३७) राजा संसारात जीवांना फक्त धर्म हा हितकारक आहे.
(अ) कधी मुख्य, प्रधान असा अर्थ होतो.
कत्थ भुवणेक्कपहुणो चरियं अम्हारिसो कहिं कुकई। (महा पृ. १.२७) कोठे जगाच्या मुख्य स्वामीचे चरित्र आणि कोठे आमच्यासारखा क्षुद्र कवि.
१
याकोबीचे भाषांतर - चुकीच्या मार्गाने जातात. एग, अवर प्रमाणे थोडाफार उपयोग होतो. ‘एग' चे अनेक अर्थ असे आहेत :- एकोऽल्पार्थे प्रधाने च प्रथमे केवले तथा। साधारणे समानेऽपि संख्यायां च प्रयुज्यते।।