________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
३३९
(२) 'क' च्या द्विसक्तीने कोणताही प्रत्येक असा अर्थ होतो.
(१) किं किं अहवा मए न कयं। (महा पृ. १४२ अ) अथवा मी काय काय बरे कले नाही? (२) विवरं मुहे विहिमि किं किं न वा होइ। (महा पृ. ५० अ) अथवा दैव विपरीत झाल्यावर काय काय बरे होत नाही?
(३) 'ज' शी उपयोग असताहि सर्व, प्रत्येक असा अर्थ होतो.
(१) जाणि काणि रयणाणि समुप्पाजंति सव्वाणि ताणि रायकुलगामीणि। (निरया पृ. २३) जी काही (म्ह.सर्व) रत्ने उत्पन्न होतात ती सर्व राजवंशात जातात. (२) जे केइ पत्थिवा। (उत्त ९.३२) जे कोणी राजे.
(४) 'क' पुढे 'नाम' असता कोण बरे, काय बरे असा अर्थ होतो. को नाम कुम्मापुत्तो। (कुम्मा. १९) कुम्मापुत्त हा कोण बरे?
(५) 'क' पुढे चि (चित्) अथवा (स्वरापुढे) 'इ' वा 'पि' किंवा 'वि' (अपि) असता कोणीतरी असा अनिश्चिततेचा बोध होतो.
(१) तत्थ कंचि साहुपुरिसं पत्थेमि। (अरी पृ.५) तेथे कोण्यातरी सजन माणसाची प्रार्थना करीत. (२) देवाण करेंति केइ पूयाओ। दाणाइ देंति केइ। (समरा पृ. ७३३) कोणी देवांची पूजा करतात. कोणी दाने देतात. (३) का वि देवया एसा। (नल पृ.१६) ही कोणी तरी देवता असावी. (४) संसारे परमत्थेण किं पि नो विज्जए चोजं। (महा पृ. २९१ अ) खरे पहाता संसारात आश्चर्य असे कोणतेही नाही.
(अ) 'क' पुढे ‘अपि' असता कधी अवर्णनीयता सूचित होते.
(१) केवलमणुभवगम्मो कोइ पमोओ समुप्पन्नो। (महा पृ.२५१ अ) केवल अनुभवगम्य असा काहीतरी (अवर्णनीय) आनंद उत्पन्न झाला.
(२) तं किं पि आसि तइया तेसिं तणयस्स संगमे सोक्खं। (सुर. १५.१७४) त्यावेळी पुत्र संगमाने त्यांना काही अवर्णनीय सुख झाले.
(ऊ) इतर सर्वनामे:(१) एग, अवर, अन्न ही अनेकवचनात योजिल्यास काही दुसरे असा अर्थ
१
सर्व लिंगात व वचन-विभक्तीत ही अव्यये 'क' पुढे येऊ शकतात.