________________
३३८
अर्धमागधी व्याकरण
'त' नसता सुध्दा नुसत्या 'ज' चा उपयोग होतो.
(१) नियगरुय पभाव पसंसणेण लजति जे महासत्ता।
(अगड ७९) जे मोठे लोक आहेत ते स्वत:च्या महान् प्रभावाच्या प्रशंसेने लज्जित होतात. (२) गरुयावराहिणं पि हु अणुकंपंतहि जे महासत्ता। (सुपास : ५४३) जे मोठे लोक आहेत ते मोठा अपराध करणाऱ्यावर सुध्दा खरोखर अनुकंपा दाखवितात.
(२) कधी सबंध वाक्याबद्दल' 'ज' येतो :
(१) सुंदरमेयं जायं जाईसरणं इमीए जं जायं। (सुर ७.११४) हिला (पूर्व) जन्मस्मरण झाले हे चांगले झाले (२) अच्छरियं जं एसो हसइ। (सुपास. ६०९) हा हसतो हे आश्चर्य आहे.
(३) कधी 'एय' बरोबर 'ज' चा उपयोग होतो. जा एसा तुह दुहिया सा। (महा पृ. ३०७ ब) जी ही तुझी मुलगी ती (४) कधी ‘इम' बरोबर 'ज' चा उपयोग होतो. (१) जे इमे साहुणो वोलीणा। (धर्मो पृ. (२) जे हे साधु गेले. (५) कधी 'अहं' बरोबर 'ज'चा उपयोग होतो. जा हं तेण परिचत्ता। (पाकमा पृ. ५) ज्या मला त्याने टाकले. (६) 'ज' च्या द्विरुक्तीने कोणताही, प्रत्येक, सर्व असा अर्थ होतो.
(१) जा जा दच्छिसि नारिओ। (दस. २.९) ज्या ज्या स्त्रिया पहाशील. (२) जा जा वच्चइ रयणी न सा पडिनियत्तई। (उत्त. १४.२५) जी जी रात्र जाते ती परत येत नाही.
(उ) प्रश्नार्थक सर्वनाम : क (किम्) : (१) प्रश्न विचारताना कोण, कोणता या अर्थी ‘क’ चा उपयोग होतो.
(१) जल बिंदुचंचले जीवियंमि को मन्नइ थिरत्तं। (कुम्मा ५९) पाण्याच्या बिंदूप्रमाणे चंचल असणाऱ्या जीविताचे बाबतीत स्थिरत्व कोण मानील? (२) को सि तुम। (धर्मो पृ. ७०) तू कोण आहेस?
१
यावेळी 'ज' चे रूप अव्ययाप्रमाणे नेहमी नपुं. द्वि.ए.व.त असते. काळे, पृ. ४७४