________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
(८) कधी 'अहं' बरोबर 'त' चा उपयोग होतो. सो य अहं । (चउ पृ.३४) आणि तो मी (९) कधी 'तुम' बरोबर 'त' चा उपयोग होतो. (१) स तुमं। (समरा पृ.६५४) तो तू (२) किं सो तुमं । (धर्मो पृ. ४०) तो तू काय ?
(१०) 'त' ची द्विरुक्ति केली असता भिन्न भिन्न कित्येक असा अर्थ होतो. (१) तेहिं तेहिं उवाएहिं । ( दस. ९.२.२० ) त्या त्या उपायांनी (२) तेहिं तेहिं महुरवयमणेहिं। (महा. पृ. ९७ अ) त्या त्या मधुर वचनांनी.
(११) तोच या अर्थी जोर देण्यास 'त' चा उपयोग होतो, यावेळी जोरदर्शक अव्यय कधी उक्त तर कधी अनुक्त' असते.
(१) ते दुमा ते पव्वया तं च अरण्णं । (नल पृ. १४) तेच वृक्ष, तेच पर्वत आणि तेच अरण्य. (२) सो मित्तो सो सुयणो सो च्चिय परमत्थबंधवो होइ । (जिन पृ. ३०) तोच मित्र, तोच सज्जन, तोच खरा बांधव होतो.
(घ) अदस् :
अर्धमागधीत ‘अदस्’ या सर्व नामाचा उपयोग अत्यंत कमी आहे. (१) दूरची वस्तु दाखविण्यास 'अदस्' चा उपयोग होतो.
असो तत्तमकासी। (सूय. १.१.३.३८) त्याने तत्त्व (निर्माण) केले. (२) कधी 'हा' ह्या अर्थी 'अदस्' चा उपयोग आढळतो.
३३७
भयवं केऽमी चारणसमणा । ( कुम्मा. १६५) भगवन्, हे चारणश्रमण कोण? (३) 'अमुग' चाही थोडा फार उपयोग आढळतो.
(१) अमुगंमि देवयायणे। (जिन पृ. ७) अमुक देवळात (२) अमुगंमि गिहे चिट्ठइ | (सुपास. ५३० ) अमुक घरात रहात आहे.
(ई) संबंधी सर्वनाम : ज (यद्) :
(१) प्रायः 'त' च्या जोडीने 'ज' चा उपयोग होत असला, तरी जोडीला
१ काळे. पृ. ५०९
२
आपटे, पृ. ९२