________________
अर्धमागधी व्याकरण
___ (४) जोर देण्यास कधी 'त' या सर्वनामाबराबर ‘इम' चा उपयोग होतो. उदा. :- इमे ते खलु बावीसं परीसहा। (उत्त २) हेच ते बावीस परीसह (त्रास)
(५) कधी कधी 'अहं' बरोबर ‘इम' चा उपयोग होतो. उदा - इमो सो हं। (नल पृ.५०) हा तो मी. (ग) त (तद्) :(१) तृतीय पुरुषी सर्वनामाप्रमाणे 'त' चा उपयोग होतो.
(१) चिंतयंतो सो निग्गओ नयराओ। (समरा पृ. २६) विचार करीत तो नगरातून बाहेर पडला. (२) तओ तेण भणियं। (समरा पृ.२९) नंतर त्याने म्हटले.
(२) नामाबरोबर 'त' चा उपयोग असता निश्चिततेचा बोध होतो. (१) मूढो खु सो राया। (समरा पृ. २७) तो राजा खरोखर मूर्ख आहे. (२) तंमि गामे। (बंभ. पृ. ६८) त्या गावात. (३) प्रसिध्द वस्तुंचा निर्देश करण्यास ‘त' चा उपयोग केला जातो. ते गिरिसिहरा ते पीलुपल्लवा ते करीर कसरवक्का। (वज्जा.
२२१) ती पर्वतशिखरे, ते पीलु वृक्षाचे पल्लव, त्या करीर (नामक) झुडपाच्या कळ्या.
(४) पूर्वगामी नामाबद्दल - त्याचा निर्देश करण्यास - ‘त'चा उपयोग होतो. माया पिया.... नालं ते मम ताणा य। (उत्त ६.३) आई, बाप.... ते माझ्या रक्षणास समर्थ नाहीत.
(५) 'ज' या संबंधी सर्वनामबरोबर प्राय: 'त' चा उपयोग होतो
(१) पावाण वि ते पावा महाणुभावाण लेंति जे दोसे। (धर्मो पृ. ६९) जे मोठ्या माणसांचे दोष काढतात ते पाप्यातले पापी होत. (२) जे विसएसु पसत्ता ते अप्पसुहेण वंचिया मूढा। भमिहिंति भवसमुद्दे दुक्ख सहस्साइ पावंता।। (पउम. ३३.३६) जे विषयात आसक्त आहेत ते मूढ अल्पसुखाने वंचित होऊन हजारो दु:खे भोगीत संसार सागरात भ्रमण करतील.
(६) कधी ‘एय' बरोबर 'त' चा उपयोग होतो. सच्चिय एसा अम्हं भगिणी। (सुर ८.१९१) तीच ही आमची बहीण. (७) कधी ‘इम' बरोबर 'त' चा उपयोग होतो. सो चेव इमो वसहो। (धर्मो पृ. १.२०) तोच हा बैल.