________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
३३५
जमहं तु पुच्छिस्सं। (सुर ४.८६) मी आता जे विचारणार आहे ते हे भगवंतांना प्रत्यक्ष (दिसतेच) आहे. (२) का एसा देवया जा नट्टविहिं दाऊण गया। (धर्मो पृ. २२१) नृत्यविधि दाखवून जी गेली (ती) ही देवता कोण?
(३) कधी पूर्वगामी वाक्याबद्दल - त्याचा निर्देश करण्यास- ‘एय' चा उपयोग केला जातो. उदा.
(१) इह वंसे जो राया तं सेवामो त्ति एस अम्ह कमो। (नल पृ.११) या वंशात जो राजा, त्याची सेवा करावी, हा आमचा क्रम (२) वेरीणं घरे कुमारो वच्चइ जो राजा, त्याची सेवा करावी हा आमचा क्रम (२) वेरीणं घरे कुमारो वच्चइ न सोहणमेयं। (कथा पृ. ३०) वैऱ्यांच्या घरी कुमार जात आहे, हे चांगले नाही.
(४) जोर देण्यास ‘त' या सर्वनामाबरोबर 'एय' चा उपयोग होतो.
(१) एसा सा मह भज्जा। (नाण ४.७०) ही ती माझी भार्या. (२) एसो सो पियययो मज्झ। (जिन पृ. ३५) हा तो माझा प्रियतम.
(५) पुष्कळदा 'अहं' बरोबरही ‘एय' चा उपयोग आढळतो.
(१) एसा सा हं। (सुपास. ५३१) ही ती मी (२ एसो सो हं तव पुत्तो। (कथा पृ.१४) हा तो मी तुझा पुत्र.
(ख) इम (इदम्) :(१) वक्त्याच्या संनिधची व्यक्ति वा वस्तु दर्शविण्यास :
(१) इमे पाणा। (उत्त २२.१६) हे प्राणी (२) इमिणा करवालेण। (समरा पृ. १२९) या तरवारीने.
(२) कधी ‘ज' या संबंधी सर्वनामा बरोबर ‘इम' चा उपयोग होतो. इमा नो छट्ठिमा जाई अन्नमन्नेण जा विणा। (उत्त.१३.७) ज्यात आपण एकत्र नाही असा हा आपला सहावा जन्म.
(३) कधी वाक्य दर्शविण्यास ‘इम' चा उपयोग होतो. (१) न हि अयं थाणुस्स अवराहो जं अंधो न पस्सइ। (समरा पृ.१७०)
आंधळ्याला दिसत नाही, हा काही खांबाचा अपराध नव्हे. (२) रायसासणमिणं जं ते गेहमवलोइयव्वं। (समरा पृ. ९१) तुझे घर (शोधून) पहायचे, ही राजाची आज्ञा आहे.