________________
अर्धमागधी व्याकरण
म्हणून कोणता उपाय आहे? (३) किं णे समुद्दतरणेणं। (समरा पृ. २०१) आम्हाला समुद्र तरण्याचा काय उपयोग आहे?
(आ) स्वदर्शक सर्वनामांचा उपयोग :(अप्प, अत्त, स, सग) :(१) पयडह अप्पणो रुवे। (सुपास. ४९२) आपली रूपे प्रकट करा.
(२) अत्तणो हियए। (अगड १४६) स्वत:च्या हृदयात (३) तं अप्पणा न पिबे। (दस ५.१.८०) ते आपण पिऊ नये (४) साओ गिहाओ निग्गच्छइ। (पएसि परि.६) स्वत:च्या घरातून बाहेर पडतो. (५) भायरो मे महाराय सगा जेट्ठ कणिट्ठगा। (उत्त २०.२६) महाराज माझे ज्येष्ठ व कनिष्ठ सक्खे भाऊ.
(इ) दर्शक सर्वनामांचा उपयोग :दर्शक सर्वनामांचा उपयोग स्वतंत्रपणे वा नामा सह करता येतो.
उदा. (१) एस मम पुत्तो। (बंभ पृ. ४३) हा माझा पुत्र (२) सा वहू। (बंभ पृ.४३) ती वधू. (नामा सह) (३) चिंतियं च णे । (बंभ पृ.४१) त्याने विचार केला (४) तीए पेसियमियं। (बंभ पृ.५३) तिने हे पाठविले आहे. (स्वतंत्रपणे)
(क) एय (एतद्) :(१) वक्त्याच्या अगदी संनिध असणारी वस्तु वा व्यक्ती दर्शविण्यास:
(१) एए सव्वे सुहेसिणो। (उत्त २२.१६) हे सर्व सुखाची इच्छा करणारे आहेत. (२) एयं मे चरियं। समरा पृ. १०९) हे माझे चरित्र.
(२) कधी ‘ज' या संबंधी सर्वनामाबरोबर ‘एय' चा उपयोग केला जातो. उदा - (१) पच्चक्खं हि भयवओ एयं
पुष्कळदा ‘सयं' (स्वयम्) या अव्ययानेच या सर्वनामाचे कार्य केले जाते. उदा. (१) अह से सयमेव लुचई केसे पंचमुट्ठीहिं। (उत्त. २२.२४) मग त्याने स्वत:च पाच मुठीत केस उपटले. (२) एक्को सयं पच्चणु होइ दुक्खं। उत्त.१३.२३) (त्याला) एकट्यालाच स्वतः दुःख भोगावे लागते. हा शब्द नेहमी पुल्लिंगी ए.व.त वापरला जातो. स, सग यांचा प्राय: विशेषणाप्रमाणेच उपयोग होतो. इदमस्तु सन्निकृष्टं समीपतरवर्ति चैतदो रूपम्। अदसस्सु विप्रकृष्टं तदिति परोक्षे विजानीयात्।।
२ ३