________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
(७) इंद, वग्घ, पुंगव, वसह, सीह, सद्दूल इत्यादि शब्द कर्मधारय समासात उत्तरपदी असता श्रेष्ठत्व दाखवितात उदा. नरवसह, अणगारसीह, पुरिसवग्घ, इत्यादि.
(८) देशनामाने कधी तद्वासी जनांचा निर्देश होतो :
उदा
(१) लाडाण माउलधूया गम्मा । ( धर्मो पृ. १४७) लाटदेशीयांचे बाबतीत मामाची मुलगी विवाह योग्य आहे. (२) अकारण कोवणा कुंकणा। (नल पृ.३) कोंकणवासी अकारण रागाविणारे असतात.
३०६ सर्वनामांचे उपयोग
-
३३३
क्रियापद वा शब्दयोगी अव्यये याशी योग असता नामाप्रमाणेच सर्वनामांचाही उपयोग होतो.
उदा (१) न देइ कोइ कस्स वि सुक्खं दुक्खं च निच्छओ एसो। (सिरि. ३२८) कोणी कुणाला सुख आणि दु:ख देत नाही, हे निश्चित आहे. (२) तुमए विणा विणासो सुहस्स मह संपयं जाओ। (नल पृ. ४७) सांप्रत, तुझ्या विना माझ्या सुखाचा नाश झाला आहे. (३) अहमेव दुहभायणं होमि। (नल पृ. १४) मीच दु:खाचे आश्रयस्थान होईन.
खेरीज भिन्न भिन्न सर्वनामांचे उपयोग पुढील प्रमाणे होतात.
१
२
(अ) पुरुषवाचक सर्वनामे :
(१) औपचारिकरीत्या द्वितीय पुरुषात 'भवंत' चा उपयोग' केला जातो. मात्र, ‘भवंत' ला क्रियापद मात्र तृतीय पुरुषी लागते. उदा. (१) सुणाउ भोई। (समरा पृ.२८४) बाईसाहेबांनी ऐकावे (२) गच्छउ भवं (समरा पृ.६३९) आपण जा. (३) भो भो पेच्छंतु भवंता । (जिन पृ. ६५) अहो, आपण पहा.
(२) पुरुषवाचक सर्वनामांची जी लघु वा संक्षिप्त रुपे आहेत (उदा. मे, से इत्यादी) ती वाक्यारंभी व प्रायः संबोधनानंतर वापरली जात नाहीत. उदा :(१) जो ते रुच्चइ तं गेण्ह । ( चउ प्र. २०) जो तुला आवडेल तो घे. (२) को भे मोक्खसाहणोवाओ। (कथा पृ. १३७) तुमचा मोक्षसाधन
आपटे, पृ. ९०
‘भवंत' ने नेहमीच आदर दर्शविला जातो, असे मात्र नाही. आपटे, पृ. ९१ पहा.