________________
प्रकरण १ : अर्धमागधी वर्णमाला
३५
'यश्रुति'१० मुळे लिहिला जाणारा 'य' यातील भेद लेखनात दाखविला जात नाही. (८) अ आणि आ खेरीज इतर कोणत्याही स्वराशी संयुक्त असलेला 'य' न लिहिता नुसता स्वरच १ लिहिला जातो. उदा. य, या, इ (यि), ई (यी), उ (यु), ऊ (यू), ए (ये), ओ (यो), यं.
तळटीपा १) वा. वें. आपटे, पृ. ९ पहा. २) ह्रस्व स्वर वा ह्रस्व स्वरयुक्त व्यंजन यांची एक मात्रा व दीर्घ स्वर अथवा
दीर्घस्वरयुक्त व्यंजन यांच्या दोन मात्रा मानतात. ३) जेव्हा ए आणि ओ हे स्वर ह्रस्व असतात तेव्हा त्यांच्याबद्दल कधी कधी
अनुक्रमे ह्रस्व इ व उ हे स्वर लिहिले जातात. काही मुद्रित पुस्तकात ह्रस्व
ए हा ऍ आणि ह्रस्व ओ हा ओ याप्रमाणे दर्शविले गेलेले आढळतात. ४) अनुस्वार म्हणजे एखाद्या अक्षरावर दिलेला बिंदू त्या अक्षराच्या उच्चारानंतर
अनुस्वाराचा उच्चार होतो. विशिष्ट ठिकाणी अनुस्वार आहे की अनुनासिक आहे, हे पद्यपंक्तीच्या __आधारे ठरते, म्हणजे जर दीर्घ अक्षर हवे असेल तर सानुस्वार उच्चार
करावयाचा; ह्रस्व अक्षर हवे असल्यास सानुनासिक उच्चार करावयाचा. ६) अस्वरं व्य ञ्जन.... न भवति / हेम. १.१. ७) शब्दान्ती फक्त 'म्' हा अनुस्वाराच्या रूपात राहू शकतो. ८) अणनो व्यञ्जने । ङ्, ञ्, ण, न् इत्येतेषां स्थाने व्यञ्जने परे अनुस्वारो
भवति । हेम. १.२५ ९) मोनुस्वारः । अन्त्यमकारस्य अनुस्वारो भवति । हेम. १.२३ १०) 'यश्रुति'साठी परि. ६० पहा. ११) म : कधी - गाईला, गाईंचा ('गाय' शब्दाची रुपे), ‘पाई-पाईं (पाय
शब्दाचे रूप).
(९) यश्रुतीने येणाऱ्या य् चा उच्चार लघु प्रयत्नाने उच्चारलेल्या 'य' प्रमाणे होतो (लघुप्रयत्नतर यकार).