________________
३४
अर्धमागधी व्याकरण
दंत
तवर्गीय व्यंजने, ल्, स् उ, ऊ, पवर्गीय व्यंजने
ओष्ठ
कंठतालु
दन्त्य ओष्ठ्य कण्ठतालव्य कण्ठौष्ठ्य दन्तौष्ठ्य नासिक्य
कंठौष्ठ दंतौष्ठ नासिका
(ङ् ञ्) ण् न् म् (अनुस्वार)
१२ वर्णांबद्दल सामान्य विचार
(अ) वर्ण उच्चारताना कमी-जास्त जोर वापरावा लागतो. ज्यांचा उच्चार करण्यास कमी जोर लागतो त्यांना अल्पप्राण म्हणतात व ज्यांचा उच्चार करण्यास अधिक जोर लागतो त्यांना महाप्राण म्हणतात. सर्व स्वर, सर्व अंतस्थवर्ण, प्रत्येक वर्गातील पहिली व तिसरी व्यंजने आणि सर्व अनुनासिके ही सर्व अल्पप्राण होत उरलेली व्यंजने महाप्राण' होत. (आ) स्वर हे ह्रस्व किंवा दीर्घ असतात. त्यांचा उच्चार करण्यास लागणाऱ्या कमी-जास्त वेळावरुन स्वर ह्रस्व अथवा दीर्घ ठरतात. (इ) प्रत्येक वर्गातील पाचहि व्यंजनांना स्पर्श' ही सामान्य संज्ञा आहे व प्रत्येक वर्गातील शेवटच्या पाचव्या व्यंजनाला ‘अनुनासिक' अशी विशेष संज्ञा आहे.
१३ अर्धमागधीतील वर्णांबद्दल अधिक विचार
(१) अर्धमागधीत ए व ओ हे स्वर ह्रस्व तसेच दीर्घ आहेत. ए आणि ओ यांचेपुढे जोडाक्षर असता त्यांचा उच्चार ह्रस्व होतो. (२) ङ् व ञ् ही अनुनासिके स्वरसंयुक्त (म्हणजे ङ, ञ अशी) वा स्वतंत्रपणे (ङ्, ञ् अशी) अर्धमागधीत आढळत नाहीत, पण अनुक्रमे कवर्गीय व चवर्गीय व्यंजनांच्या मागे त्यांना जोडून येऊ शकतात (ङौ स्ववर्यसंयुक्तौ भवत एव । हेम. १.१) उदा. सिङगार, अङग; अञ्जलि, विञ्झ; इत्यादी. (३) अर्धमागधीत अनुस्वार व अनुनासिक दोन्हीही आहेत. अनुस्वाराने ह्रस्व अक्षर दीर्घ होते. (४) स्वररहित केवळ६ व्यंजने अर्धमागधीत शब्दांच्या अन्त्यस्थानी राहू शकत नाहीत. (५) ङ्, ञ, ण, न् यांच्यापुढे व्यंजन (आल्यास वा) असल्यास त्याबद्दल अनुस्वार लिहितात.८ (६) शब्दातील अन्त्य मकाराचा अनुस्वार केला जातो. (७) 'य' आणि