________________
प्रकरण २१ : नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग
पुत्ते सुलसाए भारियाए अत्रए अणीयसे नामं कुमारे होत्था। (अंत २१) त्या नाग नावाच्या गृहस्थाचा पुत्र, सुलसा नामक भार्येचा मुलगा अणीयस नावाचा कुमार होता.
(६) कधी नामांचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो.
(अ) समासांत पूर्वपद नाम असता कित्येकदा त्याचा उपयोग विशेषणाप्रमाणे असतो. उदा. माइतरं (मातृ-गृहम्), सव्वन्नु - भासियाई (समरा पृ. १) (सर्वज्ञाची भाषणे), रुद्दक्खमला (समरा पृ.९) (रुद्राक्षमाला)
(आ) षष्ठ्यन्त नाम हे विशेषणाप्रमाणेच असते. उदा.
(१) विस्सनंदिणो महारायस्स अग्गमहिसीए दासचेडीओ। (महा पृ.३१ अ) विस्सनंदि महाराजाच्या पट्टराणीच्या दासी. (२) मह जीवस्स सामिणी देवि तं एक्का। (कथा पृ. ३) हे देवी, माझ्या जीवाची स्वामिनी तू एकटीच आहेस.
(७) नामाच्या द्विरुक्तीने ‘प्रत्येक' असा अर्थ होतो.
उदा. (१) गेहे गेहे। (विवाग पृ. ३) घरोघरी. (२) पए पए विसीयंतो। (दस २.१) पावलोपावली विषाद पावणारा. (३) दिणे दिणे एइ मह समीवं। (सुर. ११.६५) दररोज माझ्याजवळ येई.
(८) नामाच्या मागे ‘एग' आल्यास अनिश्चिततेचा बोध होतो.
उदा. - (१) पुच्छिओ अपेण एगो पुरिसो। त्याने एका पुरुषाला विचारले. (२) एगंमि नयरे। (कथा पृ ५४) एका नगरात.
(९) काही नामांच्या द्वितीया ते सप्तमीपर्यंतच्या विभक्तींच्या एकवचनी रुपांचा उपयोग क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे होतो. उदा.
द्वितीया ए.व. :- सच्चं, सुहं, रुच्छंद, उक्कोसं (जास्तीत जास्त); तृतीया ए.व. :- सुहेण, समासेणं, छंदेणं, दुहेण (दुःख), उक्कोसेण, कमेण, नियमेण, निच्छएण, विसेसेण, कट्टेण (कष्ट); चतुर्थी ए.व. :- अट्ठाए (साठी); पंचमी ए.व. :- बला (जोराने), नियमा (नियमाने), चिरकालाओ, षष्ठी ए.व. :(नादानुकारी शब्द): सरसरस्स, दवदवस्स, तडतडस्स, छडछडस्स, मडमडस्स,
१ २
काळे, पृ. २२९ नादानुकारी शब्द : चरचराए, तडतडाए, ढग्गढग्गाए, कडकडाए (समरा पृ. २५७)