________________
प्रकरण २१ नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचे उपयोग GACACACACACACACACACACACACACAXALALALACACACACACACACACACA ३०५ नामांचे उपयोग
नामांचे उपयोग पुढीलप्रमाणे होतात. (१) वाक्यात नाम हे कर्ता, कर्म, करण होऊ शकते.
उदा. (१) सुमाणुसत्तं सुकुलं सुरूवं सोहग्गमारुग्गमतुच्छमाउ। रिध्दिं च विध्दिं च पहुत्तकित्ती पुन्नप्पसाएण लहंति सत्ता ।। (सिरि. १८४) (कर्ता, कर्म, करण) चांगला माणूस जन्म, चांगले कुल व रूप, सौभाग्य, आरोग्य, चांगले आयुष्य, ऋध्दि, भरभराट व पुष्कळ किर्ती ही प्राण्यांना पुण्य प्रसादाने लाभतात.
(२) अकर्मक क्रियापदाचे पूरक म्हणून नामांचा उपयोग होतो.
उदा. - (१) मित्तो वि होइ सत्तू पुरिसाणं पुव्व कम्मदोसेणं। (नाण ४.६४) पूर्व कर्म दोषाने माणसाच्या बाबतीत मित्र सुध्दा शत्रु होतो. (२) तं सि नाहो अणाहाणं। (उत्त. २०.५६) तू अनाथांचा नाथ आहेस.
(३) सकर्मक पण अपुरे विधेय असणाऱ्या क्रियापदांचे पूरक म्हणून नामांचा उपयोग होतो. उदा.
(१) दुहं मुणइ सोक्खं। (बंभ पृ. ३६) दुःखाला सुख मानतो. (२) नयरं जाणाहि देहयं। (नाण. १.२३४) देहाला नगर समज.
(४) कधी विधेय म्हणून नामांचा उपयोग होतो. (यावेळी असणे हे क्रियापद अध्याहृत असते). उदा.
जीवदय च्चिय धम्मो। (सुपास. ६२८) जीवदया हाच धर्म. (५) दुसऱ्या नामांबद्दल अधिक माहिती सांगण्यास नामांचा उपयोग होतो.
(१) मम धम्मायरिए धम्मोवएसए समणे भगवं महावीरे। (अंत. ७६) माझे धर्माचार्य, धर्मोपदेशक, श्रमण, भगवान महावीर (२) तस्स णं नागस्स गाहावइस्स