________________
प्रकरण २०
प्रयोगविचार
BRCAERIAERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
२९८ प्रयोग
प्रयोग म्हणजे वाक्यांतील काही शब्दांची विशिष्ट ठेवण वा रचना. ही रचना कर्त्याला, कर्माला वा क्रियेला (भाव) प्राधान्य देऊन करता येते. जेथे कर्त्याला, कर्माला वा क्रियेला (भाव) प्राधान्य देऊन करता येते. जेथे कर्त्याला प्राधान्य येते तेथे कर्तरि प्रयोग, जेथे कर्माला महत्त्व आहे तेथे कर्मणि प्रयोग व जेथे क्रियेला प्रामुख्य आहे तेथे भावे प्रयोग, असे प्रयोग होतात. कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य देणे म्हणजे क्रियापदाचे रुप त्याच्या पुरुष - वचनाशी संवादी करणे होय. आणि क्रियेला महत्व देणे म्हणजे क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म यावर अवलंबून न ठेवता ते नेहमी तृ. पु. ए. व. त ठेवणे.
संस्कृतप्रमाणेच अर्धमागधीत ही कर्तरि, कर्मणि आणि भावे असे तीन प्रयोग आहेत. त्यांचा विचार आता करावयाचा आहे. २९९ कर्तरि प्रयोग
कर्तरि प्रयोगातील क्रियापद सकर्मक वा अकर्मक असेल. त्यानुसार प्रयोग सकर्मक कर्तरि अथवा अकर्मक कर्तरि म्हटला जातो.
कर्तरि प्रयोगात कर्तृपद प्रथमा विभक्तीत, कर्म असल्यास व ते उक्त असल्यास
१ कित्येकदा प्रत्यक्ष क्रियापदाऐवजी धातुसाधित विशेषणांचा उपयोग केलेला असतो. अशी धातु विशेषणे म्हणजे कर्तरि व कर्मणि भूत, धातू, विशेषणे आणि वि.क.धा.वि. होत.
मराठी प्रमाणे अर्धमागधीत कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही.
२