________________
प्रकरण १९ : समासविचार
३१७
३) निरासो-निग्गया आसा जम्हा सो । ४) निज्जीवं-निग्गओ जीवो जम्हा तं। ५) निग्गंथो - निग्गया गंथी जम्हा सो। ६) उम्मुहो- उड्ढे मुंह जस्स सो ।
उ) संख्या बहुव्रीहि
संख्यावाचकाचा इतर संख्या वाचकांशी होणाऱ्या समासास संख्या बुहव्रीहि म्हणतात.
१) सत्तट्ठ (पयाणि) - सत्त वा अट्ठ वा। २) नवदसहि (बालेहिं) नवहिं वा दसहिं वा।
ऊ) दिग् बुहव्रीहि
यातील दोन्ही पदे दिशावाचक असतात. दोन दिशामधील उपदिशा दाखविण्यास या समासाचा उपयोग होतो.
१) उत्तरपुत्थिमे - उत्तराए पुव्वाए य अंतरालं। २) दक्खिणपुव्वा दक्खिणाए पुव्वाए य अंतरालं।
ए) अनियमित बहुव्रीहि __ युध्दात परस्परावर प्रहार करण्याचे जे साधन तद्वाचक दोन सरूप आणि तृतीयान्त पदांचा बहुव्रीहि समास होतो. हा समास अव्ययरूप असतो.
उदा. दुमादुमि - दुमेहिं दुमेहिं च पहरिय इमं जुध्दं पवत्तं। याचप्रमाणे तलातलि, चलणाचलणि, सिलासिलि.
१ २ ३
वा. वे. आपटे, पृ. ६० काळे पृ. १६० उसा. २.५९