________________
प्रकरण १९ : समासविचार
असते. विग्रहात समासातील अव्यय येत नाही. त्या अव्ययाचा अर्थ येतो.
उदाहरणे : १) अणुरूवं - रूवस्स जोग्गं । २) अणुदिणं-दिणे दिणे ३) अणुदियहं दिय दिय । ४) पइदिणं - दिणे दि ५ ) अहागडं - जेव्हा कडं सिया तहा । ६) अहासुयं - सुयं अणइक्कम्म ७) जहिच्छं - इच्छाए जोग्गं । ८) जावज्जीवियं जीवियं जाव। ९) जावज्जीवं - जाव जीवो ताव |
३१३
२९७ बहुव्रीही (बहुव्वीहि)
बहुव्रीही समासातील दोन्हीही पदे गौण असून तिसरेच एखादे पद प्रधान असते. संपूर्ण समास हा समासातील पदे सोडून इतर कोणत्यातरी विशेष्याचे विशेषण असतो पण प्रत्यक्ष समासातील कोणतेही एक पद स्वतंत्रपणे इतर विशेष्याचे विशेषण असत नाही. संपूर्ण समास विशेषण बनत असल्याने ज्या विशेष्याचे विशेषण हा समास असतो. त्या विशेष्याच्या लिंगवचनाप्रमाणे बहु. समासाचे लिंग व वचन असते.
अ) विभक्ति बहुव्रीही
विभक्ती बहुव्रीहीच्या विग्रहात दोन्ही पदे कधी एकाच विभक्तीत तर कधी भिन्न विभक्तीत असतात. १) जेव्हा दोन्ही पदे एक विभक्तिक असतात. तेव्हा त्याला ‘समानाधिकरण’ बहु म्हणतात. २) जेव्हा दोन्ही पदे भिन्न विभक्तिक तेव्हा त्याला 'व्यधिकरण' बहु म्हणतात.
असतात.
विग्रहात 'ज' या सर्वनामाच्या द्वितीया ते सप्मीपर्यंतच्या कोणत्याही विभक्तिचा' उपयोग केला जातो. समानाधिकरण बहु मध्ये ज या सर्वनामाच्या व्दितीया ते सप्मीपर्यंतच्या सर्व विभक्ती येऊ शकतात. पण 'व्याधिकरण बुह मध्ये मात्र 'ज' ची फक्त षष्ठी वा सप्तमी येऊ शकते इतर कोणतीही विभक्ति
नाही.
उदा. चक्कपाणी-चक्कं पाणिम्मि जस्स सो सो । पूइकण्णी - पूई कण्णे जीसे सा। अग्गबीया
१ यावरून द्वितीया बहु., तृतीया बहु इत्यादी संज्ञा दिल्या जातात. २ काळे, पृ. १५२
। नयणविसो - नयणे विसं जस्स अग्गंमि बीयं जेसिं ते । इत्यादी