________________
३१२
अर्धमागधी व्याकरण
ए) अलुक तत्पुरूष
कधी तत्पुरूष समासात पूर्वपदाचा विभक्तिप्रत्यय तसाच राहतो. तेव्हा त्याला अलुक् तत्पुरूष म्हणतात.
उदाहरणे : १) अंतेवासी - अंते वसइ, सो २) खेयको-खे चरइ सो। ३) वणेयरो - वणे चरइ सो ४) जुहिट्ठिलो-जुहि थिरो सो ५) मणसिओ -मणसि जाओ सो। ६) अग्गेसरो - अग्गे सरइ सो।
२९६ अव्ययीभाव (अव्वईभाव)
अव्ययीभाव समासात पूर्वपद अव्यय असून समास अव्यय रूप होतो. समास अव्ययरूप असल्याने त्याचे रूप प्रायः नपुं.२ व्दि. ए. व. रूपाप्रमाणे
१ आत्तापर्यंत सांगितलेल्या पोटभेदाखेरीज तत्पुरूषाचे आणखी दोन पोटविभाग
संस्कृतमध्ये मानले जातात. ते म्हणजे 'गति' व 'प्रादि' तत्पुरूष. गति तत्पु. संस्कृतमध्ये सत्, असत्, अलं, पुरः, तिरः, इत्यादी शब्दांना काही अर्थी क्रियायोग असता गति अशी संज्ञा आहे. म्हणून या शब्दांचा जो समास तो 'गति' समास होय. हा क्रियायोग प्रायः कृ धातूचा असतो. कधी कधी भू आणि अस् ह्या धातूंचाही असतो. कधी कधी ह्या समासातील उत्तरपद धातुसाधित नामही असते. (वा. वे. आपटे पृ. ६३) उदा. तिरोभूओ, पुरक्कार (पुरस्कार) तिरक्खार (तिरस्कार), सक्कार (सत्कार) इत्यादी प्रादि तत्पु : तत्पुरूषातील पूर्वपद जेव्हा प्र. परा इत्यादी उपसर्ग असते तेव्हा प्रादितत्पुरूष होतो. (काळे पृ. १४२ उदा. अभिमुह (अभिमुख), अइंदिय (अतीन्द्रिय), अइसुहिणो, अहिराय (अधिराज), अइउसिण, अवसद्द, अवगार, पडिपह, अइनिसा, अइमुच्छिओ, अइआउलो
इत्यादी २ प्रायः म्हणण्याचे कारण अर्धमागधीत कधी अव्ययीभाव समासाची इतर
लिंगी विभक्त्यन्त रूपे आढळतात. उदा. जहक्कमेण, जावज्जीवाए, पडिरूवेण, जहिच्छाए, जहविहिणा (सुर. १३.९२) अहाकम्मेहिं, जावजीवाए, जहसत्तीए, जहाविभवेणं, अहाकमेण, जहाविहीए इत्यादी