________________
३१०
अर्धमागधी व्याकरण
अ) संस्कृतमध्येहि द्विगु समास कधी ईकारान्त स्त्रीलिंगी असतो. तसाच तो प्राकृतातहि आढळतो.
१) पंचवडी-पंचण्हं वडाणं समाहारो। २) तिवई (त्रिपदी)-तिण्हं पयाणं समाहारो। ३) सत्तसई-सत्तण्ह झयाणं समाहारो।
ई) मध्यमपदलोपी तत्पुरूष
मध्यमपदलोपी तत्पुरूष समासात दोन पदांतील संबंध स्पष्ट करण्यास लागणारे पद लुप्त झालेले असते. विग्रहात त्याचा उपयोग केला जातो.
उदाहरणे १) गंधहत्थी-गंधविसिट्ठो (अथवा) गंधप्पहाणो हत्थी २) विसमंसंविसमिस्सियं मंसं ३) कमलसरोवरं – कमलजुत्तं सरोवरं। ४) नाममुद्दा-नामकित्रा मुद्दा ५) जयहत्थी-जयावहो हत्थी ६) चिंतामणी-चिंतापूरगोमणी ७) कणयकेयणाई-कणयमयाइं केयणाई। ८) कुलबालिया-कुलजुत्ता बालिया।
उ) उपपद तत्पुरूष
ज्याचा स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही असे एखादे धातुसाधित उपपद तत्पुरूष समासात उत्तरपदरे असते. साहजिकच त्या उत्तरपदाचा विग्रहात उपयोग करता येत नाही म्हणून विग्रहात मूळ धातु (वा धातु साधित) याचा उपयोग केला जातो.
उदाहरणे : क) १) वणयरो' - वणे चरइ त्ति। २) २ सुहदो-सुहं देइ त्ति। ३) सागरंगमा-सागरं गच्छइ त्ति। ४) मुहाजीवी-मुहा जीवइ त्ति ५) निरयंगामीनिरयं गच्छइ त्ति। ६) नाणदंसणधझरे - नाणदंसणाई धरइ त्ति। ७) उरगो-उरेण गच्छइ त्ति। ८) महीवालो-महिं पालेइ त्ति। ९) लोगपज्जोयगरे३-लोगपज्जोयं करेइ त्ति। १०) दोसन्नू-दोसं जाणइ त्ति। ११) जोव्वणत्थो-जोव्वणे चिट्ठइ त्ति। १२) इंदई-इंदं जयइ त्ति।
१ पूर्वपद नाम, अव्यय असू शकते. २ याप्रमाणेच जलयरा, थलयरा, निसायरो इत्यादी ३ याप्रमाणेच अभयदए, मग्गदए, चक्खुदए, सरणदए इत्यादी ४ याप्रमाणेच तित्थकरो इत्यादी ५ याप्रमाणेच दूरत्थो, गारत्थो इत्यादी