________________
३०२
विभक्ती प्रत्ययांच्या साहाय्याने किंवा इतर योग्य शब्दांच्या साहाय्याने स्पष्ट होईल. अशातऱ्हेने समासाची पदे वेगळी करून दाखविणे याला सामासाचा 'विग्रह करणे' असे' म्हणतात. उदा. गगणपडियं - गगणाओ पडियं । (पंचमी विभक्तिचा उपयोग) कमलमुहं - कमल इव मुहं, अथवा मुहं एव कमल । देवदाणवादेवा य दाणवा य। इत्यादी
अर्धमागधी व्याकरण
२९३ समासाचे प्रकार
अर्थदृष्ट्या समासांतील पदांना कमी जास्त महत्त्व प्राधान्य असते. उदा. 'रत्तकमलं' मध्ये 'कलम' ह्या उत्तरपदाला महत्त्व आहे. अशा महत्त्वयुक्त पदाला 'प्रधान' पद व उरलेल्या कमी महत्वाच्या पदाला 'गौण' पद म्हणतात.
अर्थदृष्टीने समासात कधी दोन्ही पदांना (उदा. जीवा जीवा) कधी उत्तरपदाला (उदा. विसमरणं), कधी पूर्वपदाला (उत्त. पइदिणं) तर केव्हा दोन्ही पदांनी दर्शित होणाऱ्या अन्यपदाला (उदा. चंदव्यणा) प्राधान्य असते. यावरून समासाचे चार मुख्य प्रकार होतात ते असे :
१) उभयपदप्रधान (द्वंद्व) २) उत्तरपदप्रधान (तरपुरूष) ३) पूर्वपदप्रधान (अव्ययीभाव) व ४) अन्यपदप्रधान (बहुव्रीहि)
या चतुर्विध समासांतील अव्ययीभाव सोडून इतर तिघांचे अनेक पोटभेद आहेत. या समासांची व त्यांच्या पोटभेदांची सामान्य व विशेष लक्षणे विग्रहासह उदाहरणे आता पुढे दिली आहेत
२९४ द्वंद्व (दंद)
द्वंद्व हा उभयपद प्रधान समास आहे. तो कधी समूहाच्या कल्पनेचा दर्शक असतो तर कधी स्वतंत्रपणे विचारात घेतलेल्या वस्तूंचा निदर्शक असतो.
१
२
जेव्हां विग्रहवाक्य देता येत नाही वा समासातील पदांचा उपयोग करून विग्रह देता येत नाही तेव्हां ‘नित्य समास' होतो (काळे पृ. ११४)
द्वंद्व समास समूह कल्पनादर्शक ( समाहार) वा स्वतंत्र वस्तुदर्शक ( इतरेतर) करणे हे अर्थानुरूप बोलणाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असते.